हैदराबादमध्ये सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या!

हैदराबादमधील सैदाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंगारेनी वसाहतीत गुरुवारी एका सहा वर्षांच्या मुलीवर तिच्या शेजाऱ्याने बलात्कार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
हैदराबादमध्ये सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या!
हैदराबादमध्ये सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या!Saam Tv

हैदराबाद: हैदराबादमधील Hyderabad सैदाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंगारेनी वसाहतीत गुरुवारी एका सहा वर्षांच्या मुलीवर तिच्या शेजाऱ्याने बलात्कार करून तिचा खून Neighbor rape and murders 6 year old girl केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी ही मुलगी बेपत्ता झाली होती. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिचा परिसरात शोध घेतला परंतु ती सापडली नाही, त्यामुळे कुटुंबीयांनी याबाबत स्थानिक पोलिसांकडे पोलिस तक्रार दाखल केली.

मुलीच्या आईने तिच्या शेजाऱ्यावर संशय आला कारण तोही बेपत्ता झाला होता. पीडितेच्या आई -वडिलांनी पोलिसांच्या मदतीने त्यांच्या मुलीचा शोध घेतला. तर तिचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत संशयित आरोपीच्या घरी सापडला.

मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर ती अर्धनग्न Naked असल्याचे आणि तिच्या अंगावर चावा Biting घेतलेल्या खुणा असल्याचे आढळून आले. या घटनेमुळे संताप अनावर झालेल्या परिसरातील जनतेने दगडफेक करण्यास सुरुवात केली.

हैदराबादमध्ये सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या!
तस्करांचा थरारक पाठलाग; पोलिसांनी जप्त केला 226 किलो गांजा!

या घटनेनंतर त्या भागात अतिरिक्त दले तैनात करण्यात आली. नंतर, कडक बंदोबस्तात मृतदेह पोस्टमार्टमसाठी उस्मानिया सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला .
Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com