1857 च्या उठावातील 282 भारतीय सैनिकांचे पंजाबमध्ये सापडले सांगाडे

1857 साली झालेल्या इंग्रजांविरुद्धच्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात या सैनिकांची हत्या करण्यात आली होती.
1857 च्या उठावातील 282 भारतीय सैनिकांचे पंजाबमध्ये सापडले सांगाडे
1857 च्या उठावातील 282 भारतीय सैनिकांचे पंजाबमध्ये सापडले सांगाडेSaamTvNews

अमृतसर : पंजाबच्या अमृतसरजवळील अजनाळा येथे एका विहिरीत भारतीय जवानांचे (Indian Soldiers) सांगाडे सापडले आहेत. पंजाब विद्यापीठातील मानववंशशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. जे.एस. सेहरावत सांगतात की, हे सांगाडे २८२ भारतीय सैनिकांचे आहेत. 1857 साली झालेल्या इंग्रजांविरुद्धच्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात (India’s First Freedom Struggle) या सैनिकांची हत्या करण्यात आली होती. ही विहीर एका धार्मिक संरचनेखाली सापडली होती. सेहरावत पुढे म्हणाले कि, अभ्यासातून असे दिसून आले आहे की या सैनिकांनी डुक्कर आणि गायीच्या चरबीपासून बनवलेल्या काडतुसांच्या विरोधात इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. (Skeletons Of 282 Indian Soldiers Killed In 1857 freedom struggle found in Punjab)

डॉ. जे.एस. सेहरावत पुढे म्हणाले, यामध्ये सापडलेली नाणी, पदके, डीएनए अभ्यास, विश्लेषण, मानववंशशास्त्र, रेडिओ-कार्बन डेटिंग या सर्व गोष्टी एकाच गोष्टीकडे निर्देश करतात की हे भारतीय जवानांचे सांगाडे आहेत. 2014 मध्ये अजनाळ्यात पहिल्यांदा नर सांगाडा सापडला होता. त्यानंतरही हे भारतीय जवानांचे सांगाडे असू शकतात, असे अभ्यासात सांगण्यात आले. तथापि, मे महिन्याच्या सुरुवातीच्या अहवालात असेही म्हटले आहे की हे सांगाडे 1947 च्या फाळणीच्या काळातील असू शकतात. फ्रंटियर्स इन जेनेटिक्स या जर्नलमध्ये २८ एप्रिल रोजी प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, हे पुरुष २६ व्या नेटिव्ह बंगाल इन्फंट्री बटालियनचा भाग होते, ज्यात प्रामुख्याने बंगाल, ओडिशा, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातील सैनिकांचा समावेश होता.

कोणी केला संयुक्त अभ्यास?

मानववंशशास्त्र विभाग पंजाब विद्यापीठ, बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओ सायन्स, लखनऊ, प्राणीशास्त्र विभागाची सायटोजेनेटिक प्रयोगशाळा, बनारस हिंदू विद्यापीठ (BHU), CSIR-Centre for Cellular and Molecular Biology, हैदराबाद यांच्याकडून संयुक्त अभ्यासाला पाठिंबा देण्यात आला. हैदराबादच्या सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग आणि डीएनए फिंगरप्रिंटिंग, डायग्नोस्टिक्सने देखील या संदर्भात महत्वपूर्ण अभ्यास आणि विश्लेषण केले. पंजाब विद्यापीठातील मानववंशशास्त्रज्ञ विभागाचे प्राध्यापक जेएस सेहरावत यांनी या संशोधनाचे नेतृत्व केले.

2014 मध्ये काय झाले?

सेहरावत म्हणाले की, ह्या संपूर्ण अभ्यासाची सुरुवात 2014 मध्ये एका म्युझियम लायब्ररीपासून झाली. एका भारतीय रिसर्च स्कॉलरला, 1857 मध्ये अमृतसर येथे नियुक्त असलेल्या एका ब्रिटिश सरकारी सेवकाचे एक पुस्तक सापडले. या पुस्तकात त्याकाळच्या पंजाबविषयी बरीचशी माहिती देण्यात आली होती. या पुस्तकात 10 मे ते 1858 मध्ये एफएच कूपर याने दिल्लीच्या केलेल्या पतनापर्यंतच्या कालावधीबद्दल माहिती सांगण्यात आली आहे.

तसेच या पुस्तकात, त्या जागेचा उल्लेख करण्यात आला आहे, जिथे सैनिकांना मारून सामूहिकरित्या दफन करण्यात आले होते. हे ठिकाण अजनाळा (अमृतसर) येथील धार्मिक वास्तूखाली असल्याचे पुस्तकात लिहिले आहे. सेहरावत म्हणाले, ज्यांना हे पुस्तक सापडले आहे ते संशोधक स्वतःही अजनाळ्याचे आहेत. त्यांनी त्यांच्या घरी येऊन याबाबत प्रशासनाला माहिती दिली. मात्र, त्यानंतर कोणीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. मात्र, स्थानिक लोकांनी स्वतः खोदण्याचे काम केले. त्यांना प्रत्यक्षात धार्मिक रचनेखाली विहीर सापडली. ज्यामध्ये मानवी सांगाडे, नाणी आणि पदके होती.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com