ऐन थंडीत, महाराष्ट्र सदनात...गार पाण्याच्या अंघोळीची 'पर्वणी' !

सौर उर्जेची यंत्रणाच बिघडली
ऐन थंडीत, महाराष्ट्र सदनात...गार पाण्याच्या अंघोळीची 'पर्वणी' !
महाराष्ट्र सदन- Saam Tv


मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : दिल्लीतील New Delhi कडाक्याच्या थंडीत Winter सकाळी सकाळी थंडगार पाण्याने अंघोळ करण्याचे ‘सुख’ अनुभवायचे असेल तर राजधानीतील पंचतारांकित Five Star नवीन महाराष्ट्र सदनात Maharashtra Sadan भेट द्या...येथील सौरऊर्जेवर Solar Energy चालणारी पाणी गरम करण्याची यंत्रणाच बिघडल्याने येणाऱ्या पाहुण्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या उद्‍भवल्याचे सदनाच्या प्रशासनाने मान्य केले आहे. solar system in new delhi maharashtra sadan not working

महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त श्‍यामलाल गोयल यांनी,पाणी गरम करण्याच्या यंत्रणेत काही बिघाड झाल्याचे मान्य केले. ही समस्या सौरऊर्जा संयंत्रे सदनाच्या मुख्य वाहिनीशी जोडणाऱ्या यंत्रणेतील बिघाडामुळे उद्‍भवली होती. ही तात्पुरती समस्या दुरुस्त करण्यात आल्याचे गोयल यांनी सांगितले.

दिवाळीनंतर दिल्लीतील थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासांत पारा १९ अंशांपर्यंत आला आहे. यंदा ‘ला निना’मुळे दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडेल व डिसेंबर-जानेवारीच नव्हे तर आगामी फेब्रुवारी महिनाही दिल्लीकरांना हुडहुडी भरविणारा असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. फेब्रुवारीमध्ये तापमान पाच अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र सदन
Railway: प्रवाशांना दिलासा! प्लॅटफॉर्म तिकिटाच्या शुल्कात मोठी कपात

राजधानीत थंडी वाढत असतानाच नवीन महाराष्ट्र सदनातील पाणी गरम करण्याच्या यंत्रणेने मात्र दगा दिला. ही स्थिती सुमारे दीड महिना कायम असल्याची माहिती आहे. साधारणतः दिल्लीतील थंडीचा कडाका लक्षात घेता ऑक्टोबरच्या आसपास हिटर यंत्रणा सुरू करणे ही जबाबदारी सदनातील अभियंत्यांची अंतिम जबाबदारी सदनाच्या व्यवस्थापकांची आहे. ‘सकाळ’ने सदनाच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा भ्रमणध्वनी सातत्याने बंद आहे. त्या रजेवर असल्याची माहिती सदनातून मिळाली.

नगरपालिका, महानगरपालिकांचे पदाधिकारी व अधिकारी दिल्लीत नुकतेच आले होते. त्यांनाही थंडगार पाण्याने अंघोळ करण्याचा अनुभव घ्यावा लागला. ज्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली. त्यांना त्या त्या दिवशी व्यवस्था उपलब्ध करून दिली गेली. विज्ञान भवनात नुकतीच एक वैद्यकीय तज्ज्ञांची परिषद झाली. तीत आलेल्या एका तज्ज्ञाने गरम पाणी मिळत नसल्याची व नळाला गढूळ पाणी येत असल्याची तक्रार सदनाच्या प्रशासनाकडे केली.

मात्र काहीही उपाययोजना न झाल्याने या सरळमार्गी तज्ज्ञांनी दिल्लीतील आपल्या एका नातेवाइकांना याबद्दल सांगितले. त्यांनी त्यांच्यासाठी तातडीने पाणी गरम करण्याचा विजेवर चालणारा रॉडही खरेदी केला. दरम्यानच्या काळात सदनातून संबंधितांना गरम पाणी बादलीतून मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली.संसद अधिवेशन तोंडावर आले असताना अशा काळात नेमकी सौरऊर्जा यंत्रणा बिघडल्याने सदनाच्या प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे.


नळातून लाल पाणी
दरम्यान सदनातील वातानुकूलित खोल्यांमधील बाथरूममध्ये नळास चक्क लाल पाणी येते. बहुतेक वेळा पाण्याला दुर्गंधीही येते. या पाण्याने हातपाय तरी कसे धुवावेत असा प्रश्न येथे मुक्कामी असणाऱ्या पाहुण्यांसमोर पडतो. आयुक्त श्‍यामलाल गोयल यांनी, नळाला लाल पाणी येण्याची समस्या गेल्या सहा वर्षांपासून असल्याचे सांगितले. मात्र याचे कारण कळतच नाही असेही त्यांनी सांगितले. प्रशासन हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत असल्याचे गोयल म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com