गेम खेळायला दिली नाही म्हणून पोटच्या मुलाने केला वडिलांचा खून!

अर्जून सरकार हे मृत व्यक्तीचे नाव आहे. अर्जून हे आपली पत्नी आणि मुलगा अरुण सोबत राहत होते.
गेम खेळायला दिली नाही म्हणून पोटच्या मुलाने केला वडिलांचा खून!
गेम खेळायला दिली नाही म्हणून पोटच्या मुलाने केला वडिलांचा खून!Saam tv news

सुरत: मोबाईल हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, पण तोच मोबाईल लोकांच्या जिवावर उठला आहे. गुजरातमधील सुरतमध्ये एक प्रकरण समोर आलं आहे. वडिलांनी आपल्या मुलाला मोबाईल गेम खेळून न दिल्यांमुळे मुलाने वडिलांचा गळा आवळून खून गेला आहे. सुरत शहरातील इच्छापोर पोलिस स्टेशन परिसरात हा गुन्हा घडला आहे.

अर्जून सरकार हे मृत व्यक्तीचे नाव आहे. अर्जून हे आपली पत्नी आणि मुलगा अरुण सोबत राहत होते. मंगळवारी अर्जून हे बेशुद्ध अवस्थेत आढळले असता त्यांना रुग्णालयात दाखल केले. परंतू दाखल करण्यापुर्वीच अर्जून यांचा मृत्यू झाला होता. पत्नी आणि मुलाने डॅाक्टरांना सांगितले की अर्जून हे काही दिवसांपुर्वी बाथरुममध्ये पडले होते. त्यानंतर ते झोपले परंतू ते नंतर उठलेच नाही. मुलगा आणि पत्नीच्या सांगण्यावरुन डॅाक्टरांना काहीतरी काळंबेरं असल्याचं समोर आलं. मग नंतर डॅाक्टरांनी शवविच्छेदन करण्याचे ठरवले.

गेम खेळायला दिली नाही म्हणून पोटच्या मुलाने केला वडिलांचा खून!
यवतमाळ जिल्ह्यात गारांसह मुसळधार पाऊस; शेतकरी चिंतेत

शवविच्छेदन केल्यानंतर धक्कादायक अहवाल समोर आला. अर्जून यांचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे समोर आले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. तपास सुरु झाला. तपासाअंती मुलाने बापाचा खून केल्याचे उघड झाले. त्यानंतर अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पुढील कारवाई सुरु केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com