सोनीपत: सिंघू सीमेवर आणखी एका शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

कृषी कायद्याच्या निषेधार्थ दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, बुधवारी सोनीपतमधील कुंडली सिंघू सीमेवर निदर्शनात सहभागी एका शेतकऱ्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
सोनीपत: सिंघू सीमेवर आणखी एका शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
सोनीपत: सिंघू सीमेवर आणखी एका शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्यावृत्तसंस्था

दिल्ली: कृषी कायद्याच्या निषेधार्थ दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, बुधवारी सोनीपतमधील कुंडली सिंघू सीमेवर निदर्शनात सहभागी एका शेतकऱ्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. गुरप्रीत सिंग असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तो पंजाबमधील फतेहगढ साहिबचा रहिवासी आहे.

हे देखील पहा-

माहितीनुसार, गुरप्रीत सिंग हे फतेहगढ साहिबच्या अमरोह तहसीलमधील रुरकी गावचा रहिवासी होते. ते बीकेयू सिद्धपूरला जोडलेले होते. मात्र, त्यांची हत्या की आत्महत्या, हे अद्याप समजू शकलेले नाही. कुंडली पोलीस ठाणे दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितलं आहे.

सोनीपत: सिंघू सीमेवर आणखी एका शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
Mumbai: कामगाराने घेतला विचित्र बदला; मालकाच्या 4 वर्षीय मुलाचं केलं अपहरण अन्...

शेतकरी काढणार ट्रॅक्टर मार्च

कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. अशा परिस्थितीत 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शेतकरी संघटनांनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. किसान एकता मोर्चा अंतर्गत शेतकरी संघटनांची बैठक झाली. या बैठकीत शेतकरी आंदोलनाच्या पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली आहे. राकेश टिकैत, दर्शनपाल सिंग आणि गुरनाम सिंग यांच्यासह अनेक बडे शेतकरी नेते या बैठकीला उपस्थित होते.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com