National Herald Case : सोनिया गांधींची चौकशी संपली, तब्बल तीन तासानंतर ईडी कार्यालयातून बाहेर

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी ईडीसमोर हजर होण्याची ही तिसरी वेळ आहे. सोनिया गांधी यांची आज ईडीने तीन तास चौकशी केली.
Sonia gandhi
Sonia gandhi saam tv

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) या बुधवारी तिसऱ्यांदा अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाल्या. नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी ईडीसमोर हजर होण्याची ही तिसरी वेळ आहे. सोनिया गांधी यांची आज ईडीने तीन तास चौकशी केली. त्यानंतर ईडीने (ED) त्यांना पुन्हा नव्याने समन्स जारी केले नाही. सोनिया गांधी यांची गेल्या तीन दिवसांत ११ तास ईडीने चौकशी केली आहे. (Sonia Gandhi News In Marathi)

Sonia gandhi
मोठी बातमी! PMLA कायद्यात कोणताही बदल नाही; अटक करण्याचा ईडीचा अधिकार कायम: सर्वोच्च न्यायालय

७५ वर्षीय सोनिया गांधी यांची ईडीने मंगळवारी सहा तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना आज पुन्हा ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. याआधी २१ जुलै रोजी सोनिया गांधी यांची ईडीने दोन तास चौकशी केली होती. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने ही चौकशी केली.

ईडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हिडच्या नियमाचे पालन करून सोनिया गांधी यांची चौकशी ही ऑडिओ-व्हिडीओ स्वरुपात रेकॉर्ड करण्यात आली आहे. दुसरीकडे सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावल्याने काल काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. काल दिल्लीत राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस वरिष्ठ नेत्यांनी आंदोलन केले.

Sonia gandhi
Monsoon Session : 'आप'चे खासदार संजय सिंह यांना राज्यसभेतून केले निलंबित

काल आंदोलनावेळी राहुल गांधी यांनी केंद्रींय तपास यंत्रणांना लक्ष केलं. तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केलं जात आहे असा आरोप त्यांनी केला. तसेच राहुल गांधींनी महागाई, जीएसटी अशा अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. काल जवळपास अर्धा तास राहुल गांधी आंदोलन करत होते. यानंतर पोलिसांनी त्यांना उचलून ताब्यात घेतलेल्या इतर नेत्यांसोबत बसमधून नेलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com