मोदी सरकारवर सोनियांचा हल्लाबोल; म्हणाल्या, भाजपनं लोकांना भीतीच्या छायेखाली...

सोनिया गांधी यांनी आत्मचिंतन बैठकीच्या उद्घाटन भाषणात भाजपवर आरोप करत टीका केली.
Sonia Gandhi Latest Marathi News, Sonia Gandhi criticised PM Modi
Sonia Gandhi Latest Marathi News, Sonia Gandhi criticised PM ModiSaam Tv

नवी दिल्ली: चार राज्यात विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस (Congress) आता पक्षात महत्वपूर्ण बदल करत आहे. राजस्थानमध्ये आजपासून तीन दिवस काँग्रेसची चिंतन बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित आहेत. यावेळी गांधी यांनी आत्मचिंतन बैठकीच्या उद्घाटन भाषणात भाजपवर (BJP) आरोप करत टीका केली. 'भाजपने आपल्या देशवासीयांना भीतीच्या वातावरणात जगण्यास भाग पाडले आहे, असा आरोप सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी भाजपवर केला. (Sonia Gandhi Latest Marathi News)

Sonia Gandhi Latest Marathi News, Sonia Gandhi criticised PM Modi
एक कुटुंब एक तिकीटाच्या निर्णयावर काँग्रेसचे एकमत; काँग्रेस घेणार मोठा निर्णय

'नव संकल्प शिबीरात आपल्याला आरएसएस, भाजप (BJP), आणि त्यांच्या धोरणांमुळे देशासमोर असलेल्या आव्हानांवर चर्चा करायची आहे. सध्या मोदी सरकार देशातील अल्पसंख्याकांवर अन्याय करत आहे, असा आरोपही गांधी यांनी केला. पक्ष आणि वैयक्तिक पातळीवर आपल्या सर्वांसाठी चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आहे. पक्षात बदल ही काळाची गरज असून, आपल्या कामाची पद्धतही बदलण्याची गरज असल्याचे गांधी म्हणाले. पक्षासाठी आता सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे असंही सोनिया गांधी (Sonia Gandhi) म्हणाले.

आपण एकत्रित प्रयत्नानेच बदल घडवू शकतो, पक्षाने आपल्याला खूप काही दिले आहे. आणि आता आपल्याला पक्षाला काहीतरी द्यायची वेळ आली आहे. मी पक्षातील पदाधिकाऱ्यांना विनंती करते की, त्यांनी शिबिरात खुलेपणाने आपले मत मांडावे. त्यातून एक मजबूत पक्ष आणि पक्षातील एकतेचा संदेश देशात गेला पाहिजे, असंही सोनिया गांधी (Sonia Gandhi) म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com