झारखंडमधील पैशांच्या घबाड प्रकरणी सोनिया गांधींनी तीन आमदारांवर केली कारवाई

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी झारखंडमधील ३ आमदारांना पक्षातून निलंबित केले आहे.
Sonia Gandhi
Sonia Gandhi SAAM TV

रांची : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी झारखंडमधील ३ आमदारांना पक्षातून निलंबित केले आहे. जामतारा येथील इरफान अन्सारी, खिजरी येथील राजेश कछाप आणि कोळेबिरा येथील नमन विक्षल कोंगडी यांना निलंबित करण्यात आले आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेस अध्यक्षांनी २४ तासांत ही कारवाई केली आहे. शनिवारी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या तीन आमदारांना त्यांच्या कारमध्ये नोटांच्या बंडलांसह ताब्यात घेण्यात आले होते.

Sonia Gandhi
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल

या घटनेचा संबंध झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारच्या पाडावाशी जोडला जात आहे. याप्रकरणी रांचीच्या अरगोरा पोलीस (Police) ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. राज्यातील हेमंत सोरेन सरकार पाडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही या प्रकरणी दोनवेळा एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

Sonia Gandhi
Petrol Diesel: कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार सुरूच, पेट्रोल-डिझेलच्या दरावर काय होणार परिणाम?

येथे काँग्रेसचे (Congress) तीन आमदार रोख रकमेसह पकडल्यानंतर पक्षातच नव्हे तर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपला पैसा-बळ-कारस्थानाच्या जोरावर सत्ता मिळवायची आहे, असे काँग्रेसचे प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी म्हंटले आहे. यावर आता काँग्रेस अध्यक्षांनी तीनही आमदारांना निलंबित केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com