सोनिया गांधींची आज पुन्हा ईडीकडून चौकशी, राजघाटासह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा निषेध

सोनिया गांधी यांना आज पुन्हा चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीने समन्स बजावला आहे.
Sonia Gandhi ED Summons National Herald case Latest Update
Sonia Gandhi ED Summons National Herald case Latest UpdateSAAM TV

नवी मुंबई - गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातल्या अनेक नेत्यांची ईडी चौकशी सुरू आहे. केवळ राज्यातलेच नाही तर केंद्रातले देखील काही बडे नेतेही ईडीच्या रडारावर आहेत. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचा देखील समावेश आहे. याआधी 21 जुलै रोजी सोनिया गांधी यांची जवळपास दोन तास ईडी (ED) कडून चौकशी झाली आहे.

हे देखील पाहा -

ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणात कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी सोनिया गांधी यांची जवळपास दोन तास चौकशी केली. गेल्या महिन्यात जूनमध्ये राहुल गांधींची जवळपास 50 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतरही काँग्रेसने सलग ५ दिवस निदर्शने केली होती.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ईडीच्या दुसऱ्यांदा चौकशीच्या विरोधात काँग्रेस आज पुन्हा एकदा देशभरात रस्त्यावर उतरणार आहे. देशभरात महात्मा गांधींच्या पुतळ्यांजवळ काँग्रेस निदर्शने करणार असतानाच दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात नेत्यांचा मेळावा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी सकाळी साडेअकराच्या सुमारास ईडीसमोर चौकशीसाठी हजर होणार आहेत.

Sonia Gandhi ED Summons National Herald case Latest Update
तृतीयपंथी म्हणून बाळाला आशिर्वाद देण्यासाठी आले अन् मंत्रोच्चार करत आईच्या गळ्यातील मंगळसूत्र नेले

यापूर्वी जूनमध्ये राहुल गांधींची 5 दिवस किमान 50 तास चौकशी

या प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचीही पाच दिवसांत किमान 50 तास चौकशी झाली आहे. यावेळी पीएमएलए अंतर्गत त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला होता. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि गांधी कुटुंबीयांची चौकशी ही ईडी चौकशीचा एक भाग आहे.

काँग्रेसने राहुल गांधी यांच्या चौकशीमुळे आंदोलने केली होती. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असून, ईडीची कारवाई ही सूडाचे राजकारण असल्याचा आरोप केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com