'या' विधानसभा मतदारसंघातून सोनू सूदची बहीण लढणार निवडणूक

काेराेनाच्या दुस-या लाटेत आणि लाॅकडाउनच्या काळात साेनू सूदने ऑक्सिजन सिलिंडर, रुग्णालयातील बेड आणि इतर वैद्यकीय उपकरणांची व्यवस्थेसह अनेकांना घरी जाण्यासाठी मदत केली हाेती. त्यामुळे ताे स्वतः राजकारणात येईल असे अनेकांना वाटत हाेते.
sonu sood malvika sood
sonu sood malvika sood

माेगा (पंजाब) : पंजाब येथे आगामी वर्षात हाेणारी विधानसभा निवडणूक मालविका सूद लढवणार असल्याची घाेषणा बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने आज (रविवार) त्याच्या माेगा येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेद्वारे केली. मालविका राज्यातील जनेतची सेवा करण्यास तयार असल्याचे सांगत साेनूने ती कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. परंतु योग्य वेळी निर्णय कळवू असे त्याने म्हटले आहे. sonu sood sister malvika to contest punjab polls

sonu sood malvika sood
IND vs NZ: अजिंक्य रहाणे कर्णधार; शर्मा,पंत,बुमराह,शमीला ब्रेक

साेनू सूदने स्वत: राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट करीत मालविका मोगा मतदारसंघातून निवडणूक लढवेल असे नमूद केले. अलीकडेच साेनू सूदने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि आम आदमी पक्षाचे (आपचे) नेते अरविंद केजरीवाल आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी) अध्यक्ष सुखबीर सिंग बडा यांच्यासह इतर राजकीय नेत्यांची भेट घेतली हाेती.

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याशी झालेल्या भेटीने साेनू सूदबाबत अफवा पसरल्या गेल्या हाेत्या की तो पुढील वर्षी AAP च्या तिकिटावर पंजाब येथील विधानसभा निवडणुकीत उतरेल. सूदने केजरीवाल यांच्याशी राजकीय चर्चा झाली नसल्याचे आज स्पष्ट केले. मी कोणत्याही राजकीय पक्ष किंवा नेत्याविरोधात प्रचार करणार नाही. कोणत्याही पक्षाचा स्टार प्रचारक होण्यासही माझी तयारी नाही. मात्र बहीण मालविकाला प्राेत्साहन म्हणून तिचे काम लाेकापर्यंत पाेहचविणार आहे असे सोनू सूदने स्पष्ट केले.

केजरीवाल यांना मोगा दौरा रद्द करावा लागला

दरम्यान अरविंद केजरीवाल हे आज (रविवार) मोगा येथे दाै-यावर येणार होते. मात्र केजरीवाल यांचा दाैरा हा रद्द करण्यात आला. अरविंद केजरीवाल सोनू सूदला आपल्या पक्षात आणतील असे चित्र राजकीय क्षेत्रात निर्माण झाले हाेते. पण सोनू सूदने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्याशी भेट घेतल्यानंतर यास पूर्णविराम मिळाला. गुप्तचर यंत्रणा आणि पंजाब पोलिस शनिवारी सोनू सूदच्या घरी पोहोचले हाेते. पंजाब काँग्रेसचे काही मोठे नेते त्यांच्या निवासस्थानी येणार असल्याचीही चर्चा होती.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com