मी मुख्यमंत्री, पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहू शकते; मायावतींचं मोठं वक्तव्य

Mayawati : मायावती यांनी समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधलाय.
Mayawati Latest News
Mayawati Latest NewsSAAM TV

लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मायावतींनी समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी राष्ट्रपती व्हावं, असं त्यांना वाटतं. पण त्यांचं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असं मायावती यांनी ठणकावून सांगितलं. यावेळी त्यांनी अखिलेश यादव यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. अखिलेश यादव हे विदेशात पळून जाण्याच्या तयारीत आहेत, असं त्या म्हणाल्या. मी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होण्याचं स्वप्न बघू शकते, असंही त्या म्हणाल्या.

Mayawati Latest News
शिवसेनेची 'डिनर डिप्लोमसी'; उद्धव ठाकरेंनी बोलावली खासदारांची बैठक, काय असेल रणनीती?

मायावती यांनी पत्रकार परिषद घेऊन समाजवादी पक्षासह अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला. मी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होण्याचे स्वप्न बघू शकते. मात्र, राष्ट्रपती होण्याचं स्वप्न कधीच बघणार नाही, असं त्या म्हणाल्या. माझं संपूर्ण आयुष्य आराम करण्यासाठी नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कांशीराम यांच्या मार्गावर जाऊन मागास-पीडित-पिचलेल्या लोकांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी समर्पित केलं आहे, असं मायावती म्हणाल्या. यावेळी मायावतींनी समाजवादी पक्षाच्या नेत्यांवर तोफ डागली. आपल्या राजकीय स्वार्थासाठी मला राष्ट्रपती करण्याचं ते स्वप्न बघत आहे. पण त्यांनी हे विसरून जावं, असंही मायावतींनी निक्षून सांगितलं.

यूपीत पुन्हा बसप सरकार

लखनऊतील बसपच्या कार्यालयात मायावतींनी पत्रकार परिषद घेतली. या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला मुस्लीम समाज आणि यादवांनी एकगठ्ठा मते दिली. त्यांनी वेगवेगळ्या पक्षांसोबत आघाडीही करून बघितली. तरीही समाजवादी पक्ष सत्तेत येऊ शकला नाही. आता हे लोक समाजवादी पक्षाच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. आता पुढील काळात राज्यात पुन्हा बसपचे सरकार येईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Mayawati Latest News
लालूप्रसाद यादव यांना मोठा दिलासा, आज होणार जामिनावर सुटका

समाजवादी पक्ष आता पुन्हा कधीच सत्तेत येऊ शकणार नाही. अखिलेश यादव यांनाही ठाऊक आहे. त्यामुळे ते आता विदेशात पळून जाण्याच्या तयारीत आहेत. त्याची व्यवस्था स्वतःच करून ठेवली आहे. यावरून राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे, असं मायावती म्हणाल्या. दरम्यान, बसपच्या सत्ताकाळात राज्यात उभारलेल्या स्मारकांच्या दुरवस्थेबाबत मायावती यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवलं आहे. बसपचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री योगींच्या भेटीसाठीही गेले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com