सपा नेते आझम खान यांना जामीन मंजूर; पण तुरुंगातून सुटका नाही, कारण...

जामीन मिळूनही आझम खान तुरुंगातच राहणार आहेत, त्याचे कारण आहे...
Azam Khan
Azam Khan Saam TV

उत्तर प्रदेश: सपा नेते आझम खान (Azam Khan) यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून (Allahabad high court) मोठा दिलासा मिळाला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांना जामीन मिळाला आहे. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सपा नेते सीतापूर कारागृहात बंद होते. ज्या प्रकरणात आझम खान यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे ते वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर चुकीच्या पद्धतीने कब्जा केल्याचे आहे. या प्रकरणी शेवटची सुनावणी 5 मे रोजी झाली होती. त्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. मात्र आता याप्रकरणी सपा नेत्याला अखेर दिलासा मिळाला आहे. यापूर्वी त्यांना 71 प्रकरणात जामीन मिळाला आहे.

जामीन मिळूनही आझम खान तुरुंगातच राहणार आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप नेते आकाश सक्सेना यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. आझम खान यांनी रामपूर पब्लिक स्कूलच्या इमारतीचे बनावट प्रमाणपत्र मिळवून मान्यता मिळवल्याचा आरोप करण्यात आला होता. आता याच प्रकरणाची न्यायालयात अद्याप सुनावणी झालेली नाही.

त्यामुळे आझम खान यांची तुरुंगातून बाहेर येण्याची वेळ लांबत चालली आहे. या नव्या प्रकरणाची सुनावणी रामपूर कोर्टात 19 मे रोजी होणार आहे. या प्रकरणात त्यांना दिलासा मिळतो की धक्का बसतो, याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. हे प्रकरणही जर पूर्वीच्या खटल्याप्रमाणे लांबले तर दोन वर्षानंतरही आझम खान सीतापूर कारागृहातून बाहेर पडू शकणार नाहीत.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com