Spring influenza: कोरोनानंतर नवं संकट! देशात H3N2 विषाणूचा हाहाकार? जाणून घ्या लक्षणे आणि संरक्षणाचे उपाय

H3N2 Virus: सामान्य संसर्ग आणि H3N2 विषाणूच्या संसर्गाच्या लक्षणांमध्ये खूप फरक आहे. हा फरक समजून घेणे आवश्यक आहे.
ICMR On H3N2 Virus
ICMR On H3N2 VirusSaam TV

ICMR On H3N2 Virus : देशात इन्फ्लूएंझाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक भागात अनेक लोक खोकला, ताप आणि अंगदुखीच्या समस्येने त्रस्त आहेत. यावर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) एक निवेदन जारी केले आहे. देशभरात फ्लू आणि विषाणूजन्य तापाच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण इन्फ्लूएंझा ए चा उप-प्रकार H3N2 विषाणू असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

हवामानातील बदलामुळे दिल्ली एनसीआर आणि देशाच्या इतर भागात बरेच लोक खोकला, सर्दी आणि तापाचे बळी पडत आहेत. यातील काही लोकांना अतिशय तीव्र खोकला असून तो बरेच दिवस जात नाही. यामागे इन्फ्लूएंझा ए च्या H3N2 विषाणूचा वेगाने होणारा प्रसार हे कारण असल्याचे सांगितले जात आहे. हा विषाणू खूप घातक आहे, परंतु जीवघेणा नाही. (Latest Marathi News)

ICMR On H3N2 Virus
CCTV Video: घरातून निघाला, लिफ्टचं बटन दाबलं अन् धाडकन कोसळला; धडधाकट व्यक्तीचा क्षणात मृत्यू

तज्ज्ञांच्या मते हवामानातील बदलामुळे अशा समस्या उद्भवणे सामान्य आहे. सध्या झालेल्या हवामानातील बदलामुळे खोकला, सर्दी, तापाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. परंतु सामान्य संसर्ग आणि H3N2 विषाणूच्या संसर्गाच्या लक्षणांमध्ये खूप फरक आहे. हा फरक समजून घेणे आवश्यक आहे. ()

H3N2 विषाणूची लक्षणं

ताप

घसा खवखवणे

तीव्र खोकला

वाहणारे नाक आणि शिंका येणे

थकवा

स्नायू आणि शरीर वेदना

विषाणूपासून स्वत:चे संरक्षण कसे करावे

- हात साबणाने स्वच्च धुवा.

- वारंवार डोळ्यांना स्पर्श करणे टाळा.

- घराबाहेर पडताना चांगल्या दर्जाचे मास्क वापरा.

- शिंकताना किंवा खोकलताना तोंड आणि नाक झाका.

- अंगदुखी किंवा ताप आल्यास पॅरासिटामॉल घ्या.

- अधिकाधिक द्रवपदार्था पित राहा.

ICMR On H3N2 Virus
Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

या गोष्टींकडे करून नका दुर्लक्ष

ICMR नुसार H3N2 विषाणूच्या संपर्कात आल्यास जास्त ताप येऊ शकतो. याचा संसर्ग झाल्यास थंडी वाजून येते आणि शरारात थरथर जाणवते. तीव्र ताप येतो. ताप गेल्यानंतरही अनेक दिवस खोकला राहू शकतो. तसेच यामुळे घश्यात खवखव होते आणि आवाजात देखील कर्कशपणा येऊ शकतो, हे लक्षणं जाणवत असल्यास तात्काळ डॉक्टरांना भेटा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com