
Attack on Singer Pawan Singh : भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक पवन सिंहवर अज्ञात तरुणाने दगडाने हल्ल्या केल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील लाईव्ह कार्यक्रमात ही घटना घडल्याने एक खळबळ उडाली.
सुदैवाने गायकाला फारशी दुखापत झाली नाही. दगडफेकीनंतर गायक पवन सिंह संतप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत गायकाला सुखरूप बाहेर काढले.
पवन सिंगच्या लाईव्ह शोदरम्यान दगडफेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पवन सिंग स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे. दरम्यान, त्याच्या कानाजवळ मागून एक दगड येताना दिसला. पवन सिंहला या हल्ल्यात कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. (Viral Video)
जमावाकडून झालेल्या दगडफेकीबाबत पवन सिंह मंचावरूनच नाराजी व्यक्त करताना दिसला. घटनेनंतर काहीवेळ कार्यक्रम थांबवावा लागला. त्यानंतर वातावरण शांत झाल्यानंतर पुन्हा कार्यक्रम सुरू झाला.
दुसरीकडे, पवन सिंगला पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी पोहोचलेल्या चाहत्यांनी गोंधळ घातल्याचंही समोर आलं आहे. या कार्यक्रमात भोजपुरी पवन सिंहसोबत अभिनेत्री अंजना सिंह आणि डिंपल सिंह देखील उपस्थित होत्या.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.