जम्मू-काश्मीरमध्ये ईदच्या नमाजानंतर दगडफेक, तणाव

राजस्थानच्या जोधपूरमध्ये ईदपूर्वी उसळलेल्या हिंसाचारानंतर, जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आता ताजी घटना समोर आली
Jammu and Kashmir
Jammu and KashmirSaam Tv

वृत्तसंस्था: राजस्थानच्या जोधपूरमध्ये ईदपूर्वी उसळलेल्या हिंसाचारानंतर, जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) अनंतनाग जिल्ह्यात आता ताजी घटना समोर आली आहे. जिथे ईदच्या नमाजनंतर मशिदीबाहेर दगडफेक (Stone throwing) करण्यात आली आहे. यावेळी आंदोलकांनी सुरक्षा दलांना लक्ष्य करत दगडफेक करण्यात आला आहे. अनंतनाग जिल्ह्यातील (district) एका मशिदीबाहेर ईदच्या नमाजानंतर काही लोकांनी दगडफेक केली आहे. तोंडाला बांधून काही बदमाशांनी सुरक्षा जवानांवर दगडफेक केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर पोलिसांनी (police) प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात सुरक्षा दलाची तैनात वाढवण्यात आली आहे.

हे देखील पाहा-

जोधपूरमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी

दुसरीकडे, राजस्थानच्या जोधपूरमध्ये 2022 च्या ईदपूर्वी सोमवारी रात्री उशिरा दोन समुदायांचे लोक समोरासमोर आले आणि त्यांच्यात हाणामारी (Fighting) झाली. जोधपूरमधील जलौरी गेट चौकात स्वातंत्र्यसैनिकाच्या पुतळ्यावर इस्लामी ध्वज फडकवण्याच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्याचे पर्यवसान दगडफेकीपर्यंत झाले. दगडफेकीत अनेक जण जखमी झाले आहेत. सध्या संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण असून, हा सण जातीय सलोख्याने साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. परिसरातील तणाव पाहता इंटरनेटही बंद करण्यात आले आहे.

Jammu and Kashmir
Google Chrome चा वापर करता? लगेच करा हे महत्त्वपूर्ण काम, अन्यथा बसेल मोठा फटका

घटनेची माहिती मिळताच नियंत्रण कक्षाचा अतिरिक्त पोलिस ताफा घटनास्थळी पोहोचला आणि त्यांनी जमावाला पांगवले. यासह ज्या ठिकाणी वाद झाला तो चौक बंद करण्यात आला. यावेळी जमावाला पांगवण्यात पोलिसांवर समाजाच्या वतीने पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com