पत्नी दिवसभर फोनवर बोलायची; पतीने दिली विचित्र शिक्षा

पत्नीची हत्या करण्याचा हा दुसरा प्रयत्न
पत्नी दिवसभर फोनवर बोलायची; पतीने दिली विचित्र शिक्षा
फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा करा; शेतकऱ्यांची मागणीSaam Tv

उदयपुर - तीन दिवसांपूर्वी उदयपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. उदयपूरमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता त्याचे गूढ आता पोलिसांनी सोडवले आहे. दारू प्यायल्यानंतर पतीने या महिलेची हत्या केली. इतकेच नाही तर पत्नीची हत्या करण्याचा हा दुसरा प्रयत्न असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पहिल्या प्रयत्नात पतीने आपल्या पत्नीला विहिरीत ढकलल्यानंतरही ती बचावली होती.

हे देखील पहा -

या प्रकरणी पोलिसांनी आरोपाला अटक केली आहे.पोलीस चौकशी दरम्यन, पतीने महिलेची हत्या का केली याची तपासणी केली असता पत्नी दिवसभर फोनवर बोलायची तसेच पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.चौकशीदरम्यान पती दौलत सिंहने गुन्हा कबूल केला आहे. त्याने सांगितले की, तो आधी दारू प्यायला आणि त्यानंतर नशेत पत्नीच्या डोक्यात काठीने वार करून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर दोरीने गळा आवळून खून केला.

फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा करा; शेतकऱ्यांची मागणी
फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा करा; शेतकऱ्यांची मागणी

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता. मृतदेह मिळाल्याच्या एक दिवस आधी पती कारमधून बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी दौलतला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याचा स्वीकार केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com