Swathi Weapon: स्वदेशी 'स्वाथी' वाढवणार भारतीय सैन्याची ताकद!

जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कर स्वाथी रडारचा वापर करत आहे.
Swathi Weapon: स्वदेशी 'स्वाथी' वाढवणार भारतीय सैन्याची ताकद!
Swathi weaponSaam TV

आगामी काळात चीनकडून धोका लक्षात घेता भारतीय सैन्याने त्याप्रमाणे पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. भारतीय सैन्याला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी सैन्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केलेले 12 'स्वाथी' शस्त्रे शोधणारे (12 Swathi weapon) (परकीय शस्त्रे) रडार खरेदी करण्याचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठवला आहे. भारतीय लष्कराने 1,000 कोटी रुपयांचा डब्ल्यूएलआरचा (WLR) प्रस्ताव पाठवला आहे. आणि तो उच्चस्तरीय संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीत विचारार्थ ठेवण्याची योजना आहे, असे सरकारी सूत्रांनी ANI ला सांगितले.

डीआरडीओने विकसित केलेल्या आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने बनवलेल्या परकीय शस्त्रांचे स्थान शोधणाऱ्या या रडारला मोठे यश मिळाले आहे. या शस्त्रांचा आर्मेनियालाही पुरवठा करण्यात आला आहे. स्थाथी शस्त्र हे ५० किलोमीटरच्या परिसरातील शत्रूंच्या मोर्टर, शेल आणि रॅकेट शोधण्यासाठी मदत करते. स्थाथी शस्त्राची विशेष: म्हणजे ते एक स्वयंचलित आणि अचून स्थान शोधण्यास मदत करते. हे शस्त्र एकाच वेळी सोडलेल्या शत्रूंच्या अनेक शस्त्रांचे देखील स्थान शोधू शकते.

जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कर रडारचा वापर करत आहे. ही यंत्रणा 2018 मध्ये लष्करात चाचणीसाठी देण्यात आली होती. नवीन भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे हे स्वदेशीकरणाचे प्रमुख समर्थक आहेत. स्वयं-चालित तोफखान्या सारख्या अनेक प्रकारच्या उपकरणांची ऑर्डर फक्त भारतीय विक्रेत्यांकडे जाण्याची शक्यता आहे. लहान शस्त्रांमध्येही मोठा बदल होणार आहे. कारण या क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती करणाऱ्या भारतीय विक्रेत्यांना आता परदेशी असॉल्ट रायफलच्या नियोजित ऑर्डर देण्यात येणार आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.