
Rahul Gandhi Ordinary Passport: काँग्रेस नेते राहुल गांधी पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याआधी त्यांनी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सामान्य पासपोर्टसाठी एनओसीची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल यांच्या याचिकेला विरोध केला आहे. राहुल गांधींकडे 10 वर्षांसाठी पासपोर्ट जारी करण्याचे कोणतेही वैध किंवा प्रभावी कारण नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्वामी यांनी न्यायालयात सांगितले की, ते (राहुल गांधी) पुन्हा पुन्हा परदेशात जातात. त्यांच्या बाहेर जाण्याने तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो. आज या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे. यातच राहुल गांधींना नवीन पासपोर्ट का हवा आहे? काय आहे हा संपूर्ण वाद? जाणून घेऊ... (Subramanian Swamy opposes Rahul Gandhi plea for passport)
या वर्षी मार्चमध्ये सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना मोदी आडनाव मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. राहुल गांधी यांनी संसदेचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर त्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट सरेंडर केला. (Latest Marathi News)
आता राहुल यांना अमेरिका दौऱ्यावर जायचे आहे. अशातच त्यांना यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे. मात्र नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Herald case) त्यांच्यावर खटला सुरू आहे. या प्रकरणात ते जामिनावर बाहेर आहे. यातच त्यांना नवीन पासपोर्टसाठी (Documents Required For Passport) एनओसीची (NOC) आवश्यकता असून त्यासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतली.
सरकारी प्रतिनिधी आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी यांना डिप्लोमॅटिक पासपोर्ट जारी केला जातो. हा मरून रंगाचा पासपोर्ट (Passport Apply Online) आहे. डिप्लोमॅटिक पासपोर्टधारकांना विदेशातील दूतावासांकडून प्रवासासाठी अनेक सुविधा दिल्या जातात. तसेच इमिग्रेशन देखील सामान्य लोकांपेक्षा खूप लवकर आणि सोपे होते.
दरम्यान, राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट (Passport Seva) सरेंडर केला आहे. आता अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्यासाठी त्याला सामान्य पासपोर्ट आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे एनओसी मागितली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.