सुसाइड नोटमध्ये पंतप्रधानांचा उल्लेख: १६ वर्षीय युवकानं धावत्या ट्रेनसमोर मारली उडी

ग्वालियरमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली
सुसाइड नोटमध्ये पंतप्रधानांचा उल्लेख: १६ वर्षीय युवकानं धावत्या ट्रेनसमोर मारली उडी
सुसाइड नोटमध्ये पंतप्रधानांचा उल्लेख: १६ वर्षीय युवकानं धावत्या ट्रेनसमोर मारली उडीSaam Tv

वृत्तसंस्था : आयुष्य जगत असताना अनेक जण डोळ्यात काही स्वप्न घेऊन जगत असतात. काहीची स्वप्न पूर्ण होतात तर काहींची अपूर्ण राहत असतात. स्वप्न पूर्ण करण्याची धडपड करत असताना त्यामध्ये आलेल्या अपयशाने अनेकांच्या पदरी निराशा येत असते. यामुळे काही जण खूप टोकाचे पाऊल उचलत असतात. ग्वालियरमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये १६ वर्षीय युवकाने डोळ्यात साठवलेले स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे स्वत:चा जीव दिला आहे.

हे देखील पहा-

चांगला डान्सर होऊ शकत नाही, म्हणून तरुणाने आत्महत्या केली आहे. मात्र, आत्महत्येअगोदर तरुणाने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे. अखेरची इच्छा पंतप्रधानांनी पूर्ण करावी असे सुसाईड नोटमध्ये सांगितले आहे. सुसाईड नोटमध्ये गायक अरिजीत सिंह Arijit Singh मार्फत गायलेले गीत आणि नेपाळी कलाकार सुशांत खत्री Sushant Khatri यांनी कोरियाग्रोफ केलेला डान्सचा म्युझिक व्हिडीओ बनवला जावा असे सांगितले आहे.

झांसी रोड पोलीस स्टेशनचे प्रभारी संजीव शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार की, ग्वालियर शहरात कॅन्सर हॉस्पिटल परिसरात ११ वी मध्ये शिकणाऱ्या युवकाने रविवारी रात्रीच्या सुमारास रेल्वे ट्रॅकवर ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. या युवकाच्या मृतदेहाजवळच एक सुसाईड नोट देखील आढळली आहे. ज्यात लिहिले होते की, मी एक चांगला डान्सर बनू शकलो नाही. कारण माझ्या कुटुंबाने आणि मित्रांनी मला साथ दिली नाही, असे यामध्ये सांगितले आहे.

सुसाइड नोटमध्ये पंतप्रधानांचा उल्लेख: १६ वर्षीय युवकानं धावत्या ट्रेनसमोर मारली उडी
Maharashtra Guidelines: राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरु करण्याचा मुहूर्त ठरला

तसेच या सुसाईड नोटमध्ये युवकाने त्याच्या मृत्यूनंतर एक म्युझिक व्हिडीओ देखील बनवला जावा. त्यात एक गाणं अरिजीत सिंह आणि नेपाळी कोरिओग्राफर सुशांत खत्रीने डान्स करावा. हा म्युझिक व्हिडीओ माझ्या आत्म्याला शांती देणार आहे. या तरूणाची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पुढील चौकशी पोलीस करत आहे. परंतु, केवळ चांगला डान्सर बनू शकलो नाही, म्हणत आत्महत्या करणाऱ्या युवकाच्या घरच्यांना त्याने या घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.