Sultanpuri Delhi Case: अपघातातील मृत तरुणीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, मृत्यूचं कारणही स्पष्ट

मुलीच्या प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालात तिच्या प्रायव्हेट पार्टवर जखमेच्या कोणत्याही खुणा नसल्याचे समोर आले आहे.
Sultanpuri Kanjhawala Case
Sultanpuri Kanjhawala CaseSAAM TV

नवी दिल्ली : दिल्लीतील सुल्तानपुरी येथील कांझावाला भागात २० वर्षीय तरुणीच्या मृत्यूप्रकरणी मंगळवारी पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अहवाल पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. या अहवालात मुलीचा मृत्यू फरपटत नेल्याने झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. यासोबतच बलात्काराची कोणतीही पुष्टी झालेली नाही. पोलिसांनी रिपोर्ट दिल्यानंतर मृताचे मामाही समाधानी झाले आहेत.

रविवारी रात्री म्हणजेच 1 जानेवारी रोजी झालेल्या या घटनेत जीव गमावलेल्या मुलीच्या प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालात तिच्या प्रायव्हेट पार्टवर जखमेच्या कोणत्याही खुणा नसल्याचे समोर आले आहे. पोलिस सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. लैंगिक छळाचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय मंडळाने सोमवारी मुलीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले होते.  (Delhi News)

Sultanpuri Kanjhawala Case
Delhi News : दिल्लीतील भयावह मृत्यूचा गुंता वाढला; अजूनही १० प्रश्न अनुत्तरीत

नेमकं काय घडलं होतं?

पोलिसांच्या माहितीनुसार, कांझावाला येथे एका बलेनो कारने २० वर्षीय तरुणीच्या स्कूटीला धडक दिली. पीडित तरूणी स्कुटी चालवत होती. तर दुसरी मुलगी तिच्या पाठीमागे बसली होती. अपघात झाला त्यावेळी पाठीमागे बसलेली मुलगी जखमी झाली. घाबरलेली दुसरी तरुणी आपल्या घरी गेली. ही घटना शनिवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास घडली होती.

Sultanpuri Kanjhawala Case
Sultanpuri Delhi News : दिल्लीच्या थरारक घटनेला नवं वळण; 'त्या' रात्री तरूणी एकटी नव्हती, VIDEO आला समोर

दिल्लीच्या सुलतानपुरी कंझावाला परिसरात कारने तरुणीला सुलतानपुरी ते कांझावाला असं १२ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले होते. या कारमध्ये पाच जण होते. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला. पोलिसांना तरुणीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळला. पोलिसांनी कारवाई करून पाचही तरुणांना ताब्यात घेतले आहे. तसेच कार जप्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com