Supreme Court : अश्लील व्हिडीओ बघून नापास झालो; विद्यार्थ्याची सुप्रीम कोर्टात याचिका, पुढे काय झालं?

एका विद्यार्थ्याने युट्यूबवरील अश्लील जाहिरातीमुळे माझे लक्ष विचलित झाले आणि मध्य प्रदेश पोलिस भरती परीक्षेत आपण नापास झालो, असा दावा करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.
Supreme Court
Supreme Courtsaam tv

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात नुकसान भरपाईची मागणी करणारी एक याचिका दाखल करण्यात आली होती. संबंधित याचिकेत अश्लिल जाहिरातीमुळे परीक्षेत नापास झाल्याने ७५ लाख रुयपांची नुकसान भरपाई मागण्यात आली होती. यावर न्यायालयाने (Supreme Court) याचिकाकर्त्याला चांगलंच फटकारत २५ हजार रूपयांचा दंड केला आहे. याचिकाकर्त्याने गुगल इंडियाविरुद्ध याचिका दाखल केली होती.

Supreme Court
Chandrakant Patil : '..तर मी दिलगिरी व्यक्त करतो'; महापुरुषांवरील विधानावर चौफेर टीकेनंतर चंद्रकांत पाटील बॅकफूटवर

काय आहे प्रकरण?

एका विद्यार्थ्याने युट्यूबवरील अश्लील जाहिरातीमुळे माझे लक्ष विचलित झाले आणि मध्य प्रदेश पोलिस भरती परीक्षेत आपण नापास झालो, असा दावा करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. कोर्टाने कलम १९ (२)नुसार अशा जाहिरातांवर बंदी घालावी. तसेच ७५ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या विद्यार्थ्याने केली होती. (Latest Marathi News)

संबंधित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले आणि जर जाहिरात आवडली नाही तर त्याकडे दुर्लक्ष करू शकत होता. अशा याचिकेमुळे तुम्ही न्यायालयाचा वेळ वाया घालवला, असे म्हणत कोर्टाने २५ हजार रुपयांचा दंड केला. हा दंड अशासाठी करण्यात आला आहे, ज्यामुळे अन्य लोकांना ही गोष्ट लक्षात येईल. असं न्यायाधीशांकडून सांगण्यात आलं.

Supreme Court
Ind vs Ban: 12 वर्षांनी टीम इंडियात संधी, शमीची जागा घेणार; बांगलादेशच्या नाकीनऊ आणणार

कलम १९ (२) नुसार दाखल करण्यात आलेली ही सर्वात खराब अशी याचिका आहे. कोर्ट म्हणाले की, तुम्हाला यासाठी नुकसानभरपाई हवी आहे कारण तुम्ही परीक्षेत नापास झाला. अश्लील गोष्टींमुळे तुमचे लक्ष लागले नाही आणि कोर्टात नुकसानभरपाईसाठी आलात? कोर्टाच्या या दणक्यानंतर संबंधित याचिकाकर्त्याने आपले पालक कामगार असल्याने शिक्षा माफ करावी अशी विनंती केली.

यावर कोर्ट म्हणाले, तुम्ही फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे केले आहे. तुम्हाला वाटते की यावर माफी द्यावी पण कोणत्याही परिस्थितीत माफी मिळणार नाही. मात्र त्यानंतर कोर्टाने दंडाची रक्कम कमी केली आणि २५ हजार इतकी रक्कम भरण्यास सांगितली.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com