OBC Reservation News: ९२ नगरपरिषदांमधील ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

OBC Reservation News: राज्यातल्या ९२ नगरपरिषदांमधील ओबीसी आरक्षणावर ही सुनावणी होणार आहे.
supreme court
supreme court saam tv

शिवाजी काळे, नवी दिल्ली

OBC Reservation Court Hearing: ओबीसी राजकीय आरक्षण आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. आज, १७ नोव्हेंबर २०२२ ला ही सुनावणी पार पडणार आहे. राज्यातल्या ९२ नगरपरिषदांमधील ओबीसी आरक्षणावर ही सुनावणी होणार आहे. ओबीसी आरक्षण प्रकरणी गेल्या आठवड्यात गुरूवारी सुनावणी पार पडली होती. (Maharashtra Latest News)

supreme court
Measles Disease In Mumbai: मुंबईत गोवर आजाराचा संसर्ग वाढला; मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

ओबीसी राजकीय आरक्षण (OBC Reservation) आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court of India) महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. ९२ नगरपरिषदांच्या ओबीसींच्या निवडणूकीबाबत राज्य सरकारने अधिक वेळ मागितला होता. त्यानुसार कोर्टानं एक आठवड्याचा वेळ वाढवून दिला होता. आता पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. यात राज्य सरकारला आपली बाजू मांडावी लागणार आहे.

मुंबई महापालिका प्रभाग रचनेबाबतच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. त्याबाबत याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टात जाण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. त्यानुसार मुंबई हायकोर्टात पुढील लढाई लढवावी लागणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com