...म्हणून शाळा उघडण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयचा नकार!

राज्यांना अभ्यासासाठी शाळा पुन्हा उघडण्याचा सर्वसमावेशक आदेश देऊ शकत नाही.
...म्हणून शाळा उघडण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयचा नकार!
...म्हणून शाळा उघडण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयचा नकार!SaamTV

दिल्ली : एका 12 वीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत शाळा उघडण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात (In Supreme Court )दाखल केली होती या याचिके बाबत सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, विद्यार्थी या धोरणात्मक प्रकरणात हस्तक्षेप करू शकत नाहीत. तसेच विद्यार्थ्यांनी याचिका दाखल करण्याऐवजी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे. (Supreme Court refuses to hear school opening petition)

हे देखील पहा-

अमर प्रेम प्रकाश (Amar Prem Prakash) नावाच्या 12 वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्याने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करून शाळा School सुरू करण्याची मागणी केली होती. मागच्या वर्षी मार्च-एप्रिलपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांवर मानसिक परिणाम होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. अनेक विद्यार्थी (Students) तणावामुळेही त्रस्त आहेत. शाळांमध्ये ऑनलाईन वर्ग (Online Class) व्यवस्थित होत नाहीत त्यामुळे आमच्या शाळासुरु करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी त्या विद्यार्थ्यांने न्यायालयात याचिका (Petitions) दाखल केली होती त्यावेळी न्यायालायने या धोरणात्मक प्रकरणात विद्यार्थ्यांनी हस्तक्षेप करण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना न्यायालयाने दिला आहे.

...म्हणून शाळा उघडण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयचा नकार!
व्यसनाना आळा घालण्यासाठी तुळींज पोलिसांचा पुढाकार; युवकांसाठी राबवला नशामुक्तीचा उपक्रम!

सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड म्हणाले, "तो राज्यांना अभ्यासासाठी शाळा पुन्हा उघडण्याचा सर्वसमावेशक आदेश देऊ शकत नाही. मुलांना शाळेत परत जाण्याची गरज आहे पण, हे राज्यांनी ठरवायचे आहे." न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की ही एक बाब आहे जी आपण राज्यांवर सोडली पाहिजे. यामुळे सध्यातरी या प्रकरणावरती सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार न्यायालयाने राज्यांना दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com