Exams: ऑनलाईन-ऑफलाईन असा 'हायब्रीड' पर्याय देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार...

परीक्षा आधीच सुरू झाली आहे, आता हस्तक्षेप करणं आणि संपूर्ण प्रक्रियेत अडथळा आणणं योग्य नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
Exams: ऑनलाईन-ऑफलाईन असा 'हायब्रीड' पर्याय देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार...
Exams: ऑनलाईन-ऑफलाईन असा 'हायब्रीड' पर्याय देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार...Saam TV

संतोष शाळीग्राम, नवी दिल्ली

नवी दिल्ली: CBSE आणि CISCE बोर्डाच्या 10वी आणि 12 वीच्या परीक्षेसाठी ऑफलाईन पद्धतीऐवजी विद्यार्थ्यांना सहामाही परीक्षेला ऑनलाईन-ऑफलाईन असा 'हायब्रीड' पर्याय देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. परीक्षा आधीच सुरू झाली आहे, आता हस्तक्षेप करणे आणि संपूर्ण प्रक्रियेत अडथळा आणणे योग्य नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. (Supreme Court refuses to provide online-offline 'hybrid' exam option)

हे देखील पहा -

काही विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी हायब्रीड पद्धत वापरावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र परीक्षा आधीच सुरू झाली आहे, आता हस्तक्षेप करणे आणि संपूर्ण प्रक्रियेत अडथळा आणणे योग्य नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सहामाही परीक्षेला ऑनलाईन-ऑफलाईन असा 'हायब्रीड' पर्याय उपलब्ध नसेल. (CBSE, CISCE Board Exams) बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. परिक्षा केंद्रांची संख्या 15,000 पर्यंत वाढली आहे, असा युक्तिवाद सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयात केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com