
नवी दिल्ली: भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) आयपीओला (IPO) स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच घटनापीठासमोर प्रलंबित असलेल्या प्रकरणासह केंद्राने आर्थिक कायदा 2021 पास करण्याला आव्हान देणारा मुद्दा टॅग केला. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून 4 आठवड्यांत उत्तर दाखल करण्यासाठी आणि केंद्राच्या उत्तरावर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी आणखी 4 आठवड्यांची मुदत दिली आहे. (LIC IPO Latest Marathi News)
खरं तर, केंद्र सरकारने एलआयसीचे 5 टक्के स्टेक शेअर्सच्या स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे, त्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तिथे मुंबई आणि मद्रास उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा अर्ज फेटाळला होता. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आव्हान देण्यात आले आहे.
याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी सांगितले की, LIC च्या आयपीओमधून जे पैसे बनवले जातील तो सार्वजनिक पैसा आहे. आता एलआयसीच्या पॉलिसीधारकांचे पैसे भागधारकांना दिले जातील. सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण केले की 73 लाख अर्जदारांनी LIC IPO खरेदी केला आहे. ज्यातून सरकारला सुमारे 22,500 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
एलआयसीचे पॉलिसीधारक पोन्नमल यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती की, एलआयसीमधील सरकारी हिस्सेदारीच्या विक्री कायद्यात बदल करण्यासाठी मनी बिल पद्धत अवलंबण्यात आली आहे. ते म्हणाले होते की मनी बिलाच्या व्याख्येत ते येत नसले तरी घटनेच्या कलम 110 अंतर्गत मनी बिल आणून नियमांमध्ये बदल केले गेले आहेत.
मार्चमध्ये, मद्रास उच्च न्यायालयाने भारतीय सार्वजनिक विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील सरकारचा हिस्सा विकण्यासाठी वित्त विधेयक आणि एलआयसी कायद्यात केलेल्या बदलांना आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली होती.
आज होणार शेअर्सचे वाटप
आज LIC IPO शेअरचे वाटप आज होण्याची शक्यता आहे. LIC समभागांची सूची 17 मे रोजी जारी होणार आहे. LIC च्या IPO अंतर्गत, 16,20,78,067 शेअर्स ऑफर करण्यात आले होते पण त्या तुलनेत 2.95 पट जास्त बोली लावली गेली आहे. QIB श्रेणीतील शेअर्स 2.83 पट जास्त खरेदी केले आहेत. या श्रेणीसाठी राखीव असलेल्या 3.95 कोटी समभागांसाठी 11.20 कोटी बोली लावण्यात आल्या. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणी अंतर्गत, 2,96,48,427 शेअर्स ऑफर करण्यात आले ज्यासाठी 8,61,93,060 बोली लावल्या गेल्या आहेत.
Edited By: Pravin Dhamale
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.