Big News On Dowry Crime: सासरहून मागितलेले पैसे, कुठलेही सामान हुंडा मानले जाईल - सर्वोच्च न्यायालय

घराच्या बांधकामासाठी पैशांची मागणी करणे हा हुंडा आणि गुन्हा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
Dowry Crime
Dowry CrimeSaam Tv

नवी दिल्ली: घराच्या बांधकामासाठी पैशांची मागणी करणे हा हुंडा (Dowry) आणि गुन्हा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) म्हटले आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमणा, न्यायमूर्ती एएस बोपण्णा आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने सांगितले की, हुंडा या शब्दाचे विस्तृत अर्थाने वर्णन केले पाहिजे, जेणेकरून एखाद्या महिलेकडे कोणत्याही प्रकारची मागणी करणे मग त्यात मालमत्ता किंवा कोणत्याही मौल्यवान वस्तू असो. या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने मृतकाचा पती आणि सासऱ्याला आयपीसी कलम-304-बी (हुंडा हत्या) आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंड्यासाठी छळ करणे या आरोपाखाली दोषी ठरवले (Supreme court says any think demand from in laws should be considered in dowry crime).

Dowry Crime
'हुंडा नको मामा...'हुंडा नाकारून स्वतः च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या तरुणाची कहाणी

नेमकं प्रकरण काय?

आरोपी मृत महिलेकडे घर बांधण्यासाठी पैशांची मागणी करत होता, जे तिच्या कुटुंबीयांना देणे शक्य झालं नाही. मात्र त्यासाठी तिचा छळ करण्यात आला. त्यामुळे तिने आत्महत्या (Suicide) केली. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने म्हटले की, घराच्या बांधकामासाठी पैशांची मागणी ही हुंड्याची (Dowry) मागणी मानली जाणार नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली आहे.

Dowry Crime
ST Strike : महामंडळाने पाठवली कारणे द्या नोटीस; कारवाईच्या भितीने ST चालकाची आत्महत्या

एक महिलाच दुसऱ्या महिलेला वाचवत नसेल, तर हा गंभीर गुन्हा

दुसर्‍या हुंडा छळ (Dowry Crime) प्रकरणात सासूचे अपील फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जेव्हा एखादी महिला दुसऱ्या महिलेला वाचवत नाही, तेव्हा तो गंभीर गुन्हा आहे. न्यायालयाने सासूला दोषी ठरवून तीन महिन्यांची शिक्षा सुनावलीये. खंडपीठाने म्हटले आहे की, एखादी महिला स्वत:च्या सुनेवर एवढी क्रूरता कशी करु शकते की ती आत्महत्येचे पाऊल उचलते, ही अत्यंत भयावह परिस्थिती आहे.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com