Nupur Sharma: टीव्हीवर जा आणि माफी मागा; नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारलं

सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा(Nupur Sharma) यांना चांगलंच सुनावलं आहे.
Nupur Sharma News, Nupur Sharma case, nupur sharma controversy
Nupur Sharma News, Nupur Sharma case, nupur sharma controversySaam TV

नवी दिल्ली : प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. तुमच्या वक्तव्यामुळे देशातील वातावरण बिघडले आहे, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नुपूर शर्मा यांना चांगलंच सुनावलं आहे. तुम्ही बेजबाबदार विधान केले आहे, तुम्ही टीव्हीवर जाऊन माफी मागावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. (Nupur Sharma Latest Marathi News)

Nupur Sharma News, Nupur Sharma case, nupur sharma controversy
मोठी बातमी! धनंजय मुंडे मध्यरात्री फडणवीसांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

तुम्ही स्वत:ला वकील म्हणता, तरीही असे विधान केले. तुमच्या वक्तव्यामुळे देशातील वातावरण बिघडले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. तुमच्या वक्तव्यामुळे देशाची बदनामी झाली आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

एवढंच नाही तर, सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्माच्या आधीच्या माफीबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. तुमची माफीही सशर्त असल्याचे न्यायालयाने सांगितले दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीवर आतापर्यंत केलेल्या कारवाईवरही सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. नुपूर शर्माच्या वक्तव्यामुळे उदयपूरची घटना घडल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Nupur Sharma News, Nupur Sharma case, nupur sharma controversy
Maharashtra Political Crisis | कालचा शपथविधी बेकायदेशीर? नव्या सरकाविरोधात शिवसेना कोर्टात

मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपच्या प्रवक्ता नुपुर शर्मा यांच्या विरोधात देशभरात मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या. इतकंच नाही तर अरब राष्ट्रातूनही निषेधाचे सूर उमटले. त्यानंतर भाजपनं शर्मा यांच्यावर कारवाई करत त्यांची पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी केली.

दुसरीकडे मात्र, आता नुपुर शर्मा यांच्या समर्थनात हिंदू संघटना रस्त्यावर उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे. बिहारच्या आरा आणि हाजीपूरमध्ये नुपुर शर्मा यांच्या समर्थनात आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनात अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले होते.

नुपुर शर्मा यांच्या विरोधात मुस्लिम संघटना देशातील विविध भागात रस्त्यावर उतरल्या. अनेक भागात हिंसक आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर आता हिंदू संघटना नुपुर शर्मा यांच्या बाजूने रस्त्यावर उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com