Supreme Court News: 'घटस्फोटासाठी ६ महिने थांबण्याची गरज नाही...' काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय?

Supreme Court's Order On Divorce: या निर्णयाने ताणतणावातून जात असलेल्या दाम्पत्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळणार आहे.
Supreme Court's Order On Divorce
Supreme Court's Order On DivorceSaam TV

New Delhi News: नातेसंबंध सुधारण्याची शक्यता नसल्यास संविधानाच्या अनुच्छेद 142 च्या तरतुदींचा वापर करून दाम्पत्य घटस्फोट घेऊ शकते. त्यासाठी सहा महिने थांबण्याची गरज नाही, असा ऐतिहासिक निर्णय सुप्रिम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे कौटुंबिक ताणतणावातून जात असलेल्या दाम्पत्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळणार आहे.

Supreme Court's Order On Divorce
Beed Crime: बीडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री आठ ते दहा दुकाने फोडली, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

काय आहे न्यायालयाचा निर्णय...

सध्या कायद्यानुसार पती-पत्नी घटस्फोटासाठी राजी असेल तर फॅमिली कोर्टाकडून या दोन्ही पक्षाला विचार करण्यासाठी आणि संबंधात सुधारणा करण्यासाठी सहा महिन्याचा वेळ दिला जातो. त्यामुळे अनेकांना घटस्फोटासाठी सहा महिने थांबावे लागते. तर काहींचा सहा महिन्यात घटस्फोट घेण्याचा विचार बदलतो.

मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. सहा महिन्यानंतर आणि त्यानंतरही नातेसंबंधात सुधारणा होत नसेल तर सहा महिने थांबण्याची गरज नाही. दाम्पत्य लवकर घटस्फोट घेऊ शकतात, असं सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटलं आहे.

Supreme Court's Order On Divorce
Ratnagiri News: महाराष्ट्र दिनी दुबईमध्ये घुमला महाराष्ट्राचा ढोल; त्रिविक्रम ढोल ताशा पथकाने रचला आगळा- वेगळा विक्रम

न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, ए.एस. ओका, विक्रम नाथ आणि जेके महेश्वरी या पाच न्यायमुर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. च्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठीने 29 सप्टेंबर 2022 रोजी या प्रकरणी आपला निर्णय राखून ठेवला होता.

आता हा निर्णय देताना न्यायालयाने कोणत्याही बंधनाशिवाय पूर्ण न्याय करण्याचा कोर्टाला अधिकार आहे यात कोणतीच शंका नाही. त्यामुळेच नात्यात कधीही सुधारणा न होऊ शकत नसेल तर घटस्फोट देणं कोर्टालाही शक्य आहे, असे म्हणले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com