
जी २० परिषदेचं ऐतिहासिक यशस्वी आयोजन केल्यामुळे भारताचं जगातील प्रमुख देश कौतुक करत आहेत. परिषदेच्या यशस्वी आयोजनामुळे भारत हा ग्लोबल लीडर असल्याचं सिद्ध झालं. परंतु या जी २० शिखर परिषदेच्या दिवशी चिनी शिष्टमंडळातील एका सदस्यामुळे तणाव निर्माण झाला होता. जी २०च्या परिषदेच्या दिवशी दिल्लीमध्ये कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आला होता. तर चिनी शिष्टमंडळातील सदस्यानं आणलेल्या एका बॅगेमुळे सुरक्षाव्यवस्थंचं चिंता वाढली होती. (Latest News )
चीनमधील शिष्टमंडळाचा एक सदस्यानं एक संशयास्पद आकाराची बॅग घेऊन हॉटेल ताज पॅलेजमध्ये प्रवेश केला. सुरक्षा यंत्रणांची त्याच्यावर नजर पडली, मात्र सुरक्षा यंत्रणांना डिप्लोमॅटिक बॅग बद्दल स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. यामुळे थेट त्यावर काही कारवाई करता येत नव्हती. परंतु त्या सदस्याकडील बॅग वेगळ्याच आकाराची असल्यानं यंत्रणा सतर्क झाल्या. मात्र डिप्लोमॅट प्रोटोकॉल लक्षात ठेवत सुरक्षारक्षकांनी त्या व्यक्तीला बॅग घेऊन हॉटेलमध्ये जाऊ दिले. पण रूम व्हिजीटदरम्यान खोलीत गेलेल्या एका कर्मचाऱ्याने बॅगेत काहीतरी संशयास्पद वस्तू असल्याची माहिती दिली.
हा मेसेज वरिष्ठांपर्यंत पोहोचल्यानंतर हालचालींना वेग आला. सुरक्षा टीमनं संशस्यास्पद वाटणारी बॅग स्कॅनरमधून पास करण्यास सांगितली. यासर्व प्रकारामुळे तणाव वाढला होता. त्यात चिनी सदस्या त्यांच्या बॅगेत काय हे दाखवण्यास तयार नव्हते. यामुळे परिस्थिती अजून बिकट झाली होती. शेवटी चिनी सदस्यांनी ती संशयास्पद बॅग चिनी दूतावासात पाठवण्याचे मान्य केलं आणि प्रकरण मिटलं.
काय होतं त्या बॅगेत
चीनच्या शिष्टमंडळाने स्वतःसाठी स्वतंत्र आणि खासगी इंटरनेट कनेक्शन देण्याची मागणी केली होती. परंतु हॉटेल व्यवस्थापनाला त्याला नकार दिला होता. दरम्यान या बॅगेत काय होतं याची पूर्णत: माहिती मिळालेली नाही. दरम्यान एका अधिकाऱ्यांने सांगितले की, ते सर्विलान्स सेटअप होतं असं सांगता येणार नाही, कारण त्या उपकरणांची तपासणी करण्याची संधी मिळाली नाही.
एका गुप्तचर अधिकाऱ्याने दिलेल्या रिपोर्टनुसार, अशा उपकरणांचा वापर सेक्योर कम्युनिकेशन चॅनेल्स ब्लॉक आणि ठप्प करण्यासाठी केला जातो. पण बॅगेत काय होतं याची माहिती मिळालीच नसल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं. परंतु लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे जी२० शिखर परिषदेचे पुढील यजमान ब्राझीलचे राष्ट्रपती देखील त्याच हॉटेलात राहत होते. ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.