Kashmir : मधील फुटिरतावादी हुर्रियत नेते सय्यद अली गिलानी यांचे 92व्या वर्षी निधन

हुर्रियत कॉन्फरन्स जी चे माजी अध्यक्ष आणि फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन
Kashmir : मधील फुटिरतावादी हुर्रियत नेते सय्यद अली गिलानी यांचे 92व्या वर्षी निधन
Kashmir : मधील फुटिरतावादी हुर्रियत नेते सय्यद अली गिलानी यांचे 92व्या वर्षी निधनSaam Tv

हुर्रियत कॉन्फरन्स जी Hurriyat Conference G चे माजी अध्यक्ष आणि फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी Syed Ali Shah Geelani यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. बुधवारी श्रीनगरमध्ये आपल्या राहत्या घरी त्यांनी अखरेचा श्वास घेतला आहे. त्यांच्या छातीमध्ये दुखत असल्याने, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. जम्मू- काश्मीरच्या Jammu and Kashmir माजी मुख्यमंत्री CM आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती Mehbooba Mufti यांनी ट्वीट करून, याबाबत दुःख व्यक्त केले आहे.

हे देखील पहा-

कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितले आहे की, गिलानी साहेबांच्या निधनाच्या वृत्ताने दुःखी झाली आहे. आम्ही बर्‍याच विषयवार सहमत होऊ शकलो नाही, परंतु मी ठामपणे आणि दृढ विश्वासाने आपल्या भूमिकांवर ठाम राहिल्यामुळे त्यांच्या आदर करते. अल्लाह त्यानां जन्नत देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि हितचिंतकांना संवेदना देवो. गिलानी बराच काळापासून आजारी होते.

२००८ पासून त्यांच्या हैदरपोरा या ठिकाणी असलेल्या निवासस्थानी नजरकैदेत होते. मागील वर्षी त्यांनी हुर्रियत कॉन्फरन्स जी च्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. सय्यद अली शाह गिलानी यांचा जन्म २९ सप्टेंबर १९२९ या दिवशी झाला होता. ते जम्मू- काश्मीरचे फुटीरतावादी नेते होते. ते आधी जमात- ए- इस्लामी काश्मीरचे सदस्य देखील होते, पण नंतर तेहरिक- ए- हुर्रियतची स्थापना करण्यात आली.

Kashmir : मधील फुटिरतावादी हुर्रियत नेते सय्यद अली गिलानी यांचे 92व्या वर्षी निधन
अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत खालावली; ICU मध्ये दाखल

त्यांनी जम्मू- काश्मीर मधील फुटीरतावादी पक्षांचा गटाचे आणि ऑल पार्टीज हुर्रियत कॉन्फरन्स APHC चे अध्यक्ष म्हणून काम करत असत. ते १९७२, १९७७ आणि १९८७ मध्ये जम्मू- काश्मीरच्या सोपोर मतदारसंघा मधून आमदार होते. जून २०२० मध्ये त्यांनी हुर्रियत कॉन्फरन्सचे प्रमुखपद देखील सोडले होते. दरम्यान, पोलीस महानिरीक्षक काश्मीर रेंज विजय कुमार यांनी खोऱ्यात निर्बंध लादल्याकरिता माहिती देण्यात आली आहे. तसेच इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com