Taiwan: 13 मजली इमारतीला भीषण आग, 46 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

तैवानमध्ये आज गुरुवारी 13 मजली निवासी इमारतीत आग लागली आहे. त्यात 46 लोकांचा मृत्यू झाला आहे.
Taiwan: 13 मजली इमारतीला भीषण आग, 46 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी
Taiwan: 13 मजली इमारतीला भीषण आग, 46 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमीSaam Tv

Taiwan: दक्षिण तैवानमध्ये Taiwan Fire आज गुरुवारी 13 मजली निवासी इमारतीत आग लागली आहे. त्यात 46 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इतर सुमारे 41 जण भाजले गेले आहेत. काऊशुंग शहराच्या अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे की, आग पहाटे तीनच्या सुमारास लागली होती. तर ही आग अत्यंत 'भीषण' होती. ज्यामुळे इमारतीचे अनेक मजले जळून खाक झाले आहेत. तैवानच्या अधिकाऱ्यांनीही आगीच्या घटनेत 46 लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.

त्याचवेळी अग्निशमन विभागाचे प्रमुख ली चिंग-सिऊ यांनी सांगितले की, 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह शवागारात पाठवण्यात आले आहेत. त्याच वेळी, 55 लोकांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यापैकी 14 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Taiwan: 13 मजली इमारतीला भीषण आग, 46 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी
Hingoli: भावना गवळींच्या निकटवर्तीयांना ईडीने घेतले ताब्यात

अग्निशमन दलाचे जवान शोध आणि बचाव कार्य करत आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तेथील लोकांनी सांगितलं की, स्थानिक माध्यमांना सांगितले की त्यांनी पहाटे 3 च्या सुमारास स्फोट ऐकला.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.