प्रेमासाठी काय पण! पत्नीच्या प्रेमात पठ्ठ्याने बांधला ताजमहाल (पाहा व्हिडिओ)

आनंद चोकसे असे या पतीचे नाव आहे.
प्रेमासाठी काय पण! पत्नीच्या प्रेमात पठ्ठ्याने बांधला ताजमहाल (पाहा व्हिडिओ)
प्रेमासाठी काय पण! पत्नीच्या प्रेमात पठ्ठ्याने बांधला ताजमहाल (पाहा व्हिडिओ)Saam Tv

इंदोर – प्रेमासाठी काय पण, चंद्र आणि सूर्य आणण्याच्या बाता असे अनेक प्रेमवीर करत असतात मात्र मध्यप्रदेश (Madhya Pradesh) मधल्या एका पतीने आपल्या पत्नीच्या प्रेमासाठी चक्क ताजमहाल (Taj Mahal) बंदला आहे. बादशहा शहाजहान यांनी पत्नी मुमताज यांच्या स्मरणार्थ बांधलेली ताजमहाल ही वास्तू म्हणजे तमाम प्रेमीकासाठी एक आदर्श उदाहरण. याच उदाहरणला समोर ठेवून मध्यप्रदेशमधील एका पतीने आपल्या पत्नीसाठी ताजमहाल सारख्या हुबेहूब घराची उभारणी केली आहे. सध्या हे घर चर्चेचा विषय ठरत आहे. आनंद चोकसे असे या पतीचे नाव आहे.

तब्बल तीन वर्षाच्या बांधकामानंतर ही ताजमहाल सारख्या हुबेहूब वास्तू उदयास आली आहे. आनंद ताजमहालच्या प्रेमात होते ही वास्तु त्याला नेहमीच मोहात पाडायची अशा प्रकारची वास्तू कोठेही नसल्याने त्याच्या डोक्यात अचानक एक कल्पना आली की आपण जर बादशहा शहाजहान सारखे अशा प्रकारचे घर आपल्या पत्नीसाठी बांधले तर काय होईल.

प्रेमासाठी काय पण! पत्नीच्या प्रेमात पठ्ठ्याने बांधला ताजमहाल (पाहा व्हिडिओ)
अभिमानास्पद! शेतकरी कुटुंबातील ध्येयवेड्या तरुणीची जिद्द; आसाम रायफल्समध्ये निवड

हा विचार पक्का होताच अशोकने २०१८ साली या सुंदर घराच्या बांधकामाला सुरुवात केली. ही ताजमहाल सदृश्य वस्तू वास्तू बांधण्यात तीन वर्षे लागली. ताजमहाल प्रमाणेच या घरावर 29 फूट उंचीचा घुमट बांधण्यात आला आहे. चारी बाजूला चार मनोरे बांधण्यात आल्या आहेत. घराच्या फ्लोरिंग साठी राजस्थानातील खास संगमरवर वापरले आहेत. या आलिशान घरामध्ये चार बेडरूम एक हॉल, लायब्ररी आणि मेडिटेशन हॉल देखील बांधण्यात आला आहे. अंधारात हे घर ताजमहाल प्रमाणेच बाहेरून चमकत असल्यासारखे दिसते.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com