महिलांच्या अधिकारांची बातमी करणाऱ्या पत्रकारांना तालिबान्यांची अमानुष मारहाण

महिलांच्या आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी Etilaatroz या वृत्तपत्राचे दोन पत्रकार गेले होते. यादरम्यान तालिबान्यांनी दोन्ही पत्रकारांना कस्टडीमध्ये घेत त्यांना अमानुष मारहाण केली.
महिलांच्या अधिकारांची बातमी करणाऱ्या पत्रकारांना तालिबान्यांची अमानुष मारहाण
महिलांच्या अधिकारांची बातमी करणाऱ्या पत्रकारांना तालिबान्यांची अमानुष मारहाणSaam Tv News

काबुल: अफगाणिस्तानमध्ये तालिबानने त्यांचे अंतरिम सरकार स्थापन केले आहे. मात्र या तालिबान सरकारमध्ये एकही महिला नेता किंवा मंत्री नाही त्यामुळे इथल्या महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. महिलांनाही सत्तेत वाटा द्या या मागणीसह इथल्या महिला आंदोलनं करत होत्या. या आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी Etilaatroz या वृत्तपत्राचे दोन पत्रकार गेले होते. यादरम्यान तालिबानी तिकडे आले आणि दोन्ही पत्रकारांना ताब्यात घेतले. त्यानंतर कस्टडीमध्ये असताना त्यांना अमानुष मारहाण केली. (Taliban inhumane treatment of journalists covering women's rights)

हे देखील पहा -

नेमत नकदी आणि ताकी दर्याबी या दोन पत्रकारांना अमानुष मारहाण आणि छळ झाल्यानंतर हे फोटोज् व्हायरल झाले आहेत. त्यांच्या पाठीवर आणि पृष्ठभागावर चाबुक आणि दांडक्याचे व्रण दिसतायत तसेच रायफलनेही मारहाण केली आहे. यावरुन तालिबाबने त्यांना किती अमानुषपणे मारले असेल हे लक्षात येते. या प्रकारामुळे जगभरातून चिंता व्यक्त केली जातेय. खरंतर महिलांचं हे आंदोलन इकतं मोठं नव्हतं, पण एका छोट्याशा आंदोलनानेही तालिबान्यांचा गार राग अनावर होतो हे या घटनेवरुन लक्षात येतं.

महिलांच्या अधिकारांची बातमी करणाऱ्या पत्रकारांना तालिबान्यांची अमानुष मारहाण
Rajyasabha Election: राज्यसभेच्या पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर

तालिबानने अफगाणिस्तानातील महिलांवर अनेक निर्बंध लावले आहेत. मुला-मुलींनी एकत्र शिकु नये यासाठी महाविद्यालयात पर्दा लावून शिकवण्यात येत आहेय तसेच महिलांनी हिजाब परिधान करणं सक्तीचं केलं आहे. याशिवाय कोणतीही स्त्री सोबत पुरुष असेल तरच समाजात वावरु शकते. यावरुन आपल्याला अफगाणिसतानच्या भयानक परिस्थितीची कल्पना येते.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com