धक्कादायक! गरिबीची भीषण दाहकता; महिलेने पोटच्या बाळाला २० हजारांना विकले

पोलिसांनी या लहान बाळाला सीडब्लूसी कडे सोपवले आहे.
धक्कादायक! गरिबीची भीषण दाहकता; महिलेने पोटच्या बाळाला २० हजारांना विकले
Tamil Nadu PoliceSaam Tv

चेन्नई: तामिळनाडूत (Tamil Nadu) आपल्या तीन दिवसाच्या बाळाला २० हजार रुपयांना विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मागिल आठवड्यात घडली होती. या घटनेत २ महिलांना अटक करण्यात आली आहे. चंद्रा अस या महिलेचं नाव आहे. पोलिसांनी या लहान बाळाला सीडब्लूसी कडे सोपवले आहे. (Tamil Nadu Facing poverty woman sells baby for Rs 20,000 2 detained)

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गेल्या आठवड्यात तिरुवल्लूरमधील मापेडू येथे एक महिला प्रसूतीनंतर रुग्णालयातून रिकाम्या हाताने घरी परतली. त्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे. बाळाच्या आईचे नाव चंद्रा आहे, तर ज्या महिलेने ते बाळ विकत घेतले तिचे नाव जयंती आहे.

हे देखील पाहा

चंद्रा, श्रीपेरंबदुर पंचायतीमध्ये कंत्राटी कामगार आहे. तिला दोन मुले आहेत. ती महिला तिसऱ्यांदा गर्भवती होती. जयंती या महिलेने तिचा भाऊ कुमारसाठी २० हजार रुपयांना बाळ घ्यायचे होते. तिने चंद्रा या महिलेने या संबंधी सहमती दर्शवली. जयंती या महिलेने यासाठी ४ हजार रुपये अॅडव्हान्स दिला.

गेल्या आठवड्यात, पेरांबक्कमच्या सरकारी रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर, चंद्राने बाळाला जयंतीच्या स्वाधीन केले आणि घरी गेली. "तिच्या गावातील अनेक शेजाऱ्यांना तिला हॉस्पिटलमधून रिकाम्या हाताने परतताना पाहून धक्काच बसला. तिने शेजाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तरं दिले नाही. दबाव वाढू लागल्यावर, तिने वेगवेगळी कारणे देण्यास सुरुवात केली.

या विक्रीबद्दल माहिती मिळालेल्या एका पोलिस पथकाने चंद्राची चौकशी केली, ती सुरुवातीला खोट बोलली होती पण नंतर तिने आपल्या मुलाला विकल्याची कबुली दिली. तिचा नवरा मद्यपी आहे, काम करत नाही. त्यामुळे तिला गरिबीला समोरे जावे लागत होते. त्यामुळे तिने बाळाला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी (Police) जयंतीला आणि चंद्रा या महिलेला ताब्यात घेतले आहे.(Tamil Nadu Facing poverty woman sells baby for Rs 20,000 2 detained)

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.