Tamil Nadu : भाजपला मोठा झटका; 13 नेत्यांनी पक्ष सोडला

तामिळनाडूमध्ये भाजपला मोठा झटका बसला आहे.
Bjp Flag
Bjp Flag saam tv

Tamil Nadu BJP : तामिळनाडूमध्ये भाजपला मोठा झटका बसला आहे. चेन्नईमधील आय-टी विंगच्या १३ पदाधिकाऱ्यांनी एकत्रच सर्वांनी पक्ष सोडला आहे. तामिळनाडूमध्ये आय टी-विंगच्या १० जिल्हा सचिव आणि २ जिल्हा उपसचिवांनी पक्ष सोडल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

भाजप आयटी विंगचे जिल्हाध्यक्ष अनबरासन यांचं म्हणणं आहे की, वर्षोनुवर्षे काम करून सुद्धा पक्षात सुधारणा होत नव्हत्या. त्यामुळे १३ नेत्यांनी राजीनामा दिला.

मीडिया रिपोर्टनुसार, 'एनआयए'वृत्त संस्थेशी संवाद साधताना अनबरासन यांनी सांगितले की, 'मी अनेक वर्षांपासून भाजपसाठी काम केलं आहे. लोकांना माहीत आहे की, मी कोणत्याही पदाची आशा केली नव्हती. गेल्या काही दिवसांपासून पक्षाची स्थिती चांगली नव्हती, त्यामुळे राजीनामा दिला'.

Bjp Flag
Pandharpur: अमानुषतेचा कळस! 20 ऊसतोड मजुरांना पंढरपूरमध्ये ठेवले डांबून, महिलांसह अल्पवयीन मुलांचाही समावेश

भाजप आणि एआयडीएमके पक्षात रंगलं शाब्दिक युद्ध

तामिळनाडूत भाजप (BJP) आणि एआयडीएमके पक्षात चांगलंच शाब्दिक युद्ध पेटलं आहे. भाजपचे काही पदाधिकारी एआयडीएमके पक्षात प्रवेश करत असताना तामिळनाडूचे भाजप अध्यक्ष अन्नामलाई यांनी म्हटलं आहे की, 'तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) भाजपचं बळ वाढत आहे'.

भाजपला 'एआयडीएमके' पक्षाकडून प्रत्युत्तर देण्यात आले की, '२०२१ मध्ये भाजप आमदारांचा विजय हा एआयडीएमके पक्षामुळे झाला आहे. याआधीच्या निवडणुकीत तर नोटा (NOTA) पेक्षा कमी मतं मिळाली होती'.

Bjp Flag
NCP: मोठी बातमी! शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत; नागालँडमध्ये भाजपाप्रणित सरकारला पाठिंबा

तामिळनाडूचे भाजप अध्यक्ष अन्नामलाई यांनी सांगितले की, 'भाजपच्या चार नेत्यांनी 'एआयडीएमके' पक्षात प्रवेश केला आहे. येथील द्रविड नेते विचार करतात की, ते मोठे पक्ष चालवत आहेत. भाजपवर सहज मात करू इच्छित आहे. त्यांचा पक्षाचा विकास करू इच्छित आहे. यावरून दिसून येत आहे की, तामिळनाडूमध्ये भाजप वाढत आहे'. 'एआयडीएमके' आणि भाजपमध्ये सुरू असलेलं शाब्दिक युद्ध लोकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com