Tamilnadu Crime News: 'घरी जावून अभ्यास कर' वडिलांनी खडसावले अन् घडलं भयंकर; ९ वर्षीय इंस्टाग्राम क्विनने थेट...

Crime News Update: शुल्लक कारणावरुन चिमुकलीने हे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात खळबळ माजली आहे..
TamilNadu Crime News
TamilNadu Crime NewsSaam tv

Tamilnadu News: तामिळनाडूतील (TamilNadu) पेरियाकुप्पम येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तमिळनाडूमधील एका 9 वर्षीय मुलीने किरकोळ कारणावरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रतीक्षा असे या मुलीचे नाव असून तिचे वडिल कृष्णमृर्ती यांनी तिला अभ्यास कर सांगितल्यावर असे धोकादायक पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. ही मुलगी इंस्टा क्विन म्हमूनही ओळखली जात असल्याचेही सांगण्यात आले आहे. (Latest Marathi News)

TamilNadu Crime News
Sangli Fox Attack : थरारक! आईला वाचवण्यासाठी मुलीने थेट पिसाळलेल्या कोल्ह्याशी दिली झुंज! गळा पकडला अन्....

याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेच्या दिवशी ही मुलगी आपल्या आजीच्या घरापाशी खेळत होती. यावेळी तिच्या वडिलांनी तिला ओरडून घरी जावून अभ्यास करण्यास सांगितले. तसेच घराची चावीहीदिली. यानंतर ते आपल्या बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी बाहेर गेले. रात्री ८.१५ च्या सुमारास ते घरी परतले असता त्यांना घर आतून बंद असल्याचं समजलं. यानंतर त्यांनी आपल्या मुलीला दरवाजा उघडण्यास सांगितला. मात्र आतमधून कोणताही आवाज आला नाही.

TamilNadu Crime News
Akola News : रेल्वेत चढताना आईचा तोल गेला, पाठोपाठ लेकीनेही घेतली उडी अन्... थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

मुलीने कोणताही प्रतिसाद न दिल्याने ते घाबरले आणि त्यांनी खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केला असता त्यांची मुलगी गळ्यात टॉवेल लटकवलेल्या अवस्थेत दिसली आणि ती रडत होती. यानंतर तिला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com