Tamilnadu News: दारु जिवावर बेतली! ३ महिलांसह १० जणांचा मृत्यू; तामिळनाडूमधील घटनेने खळबळ

Tamilnadu Latest News: तमिळनाडूमध्ये विषारी दारु पिवून मृत्यू झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत
TamilNadu News
TamilNadu NewsSaamtv

Tamilnadu Toxic Liquor News: तामिळनाडूच्या विल्लुपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यात बनावट दारू प्यायल्याने तीन महिलांसह दहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये विल्लुपुरम जिल्ह्यातील मारक्कनमजवळील एकिरकुप्पम येथील रहिवासी असलेल्या सहा जणांचा समावेश आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

TamilNadu News
Ahmednagar clash: अकोल्यानंतर अहमदनगरमध्ये दोन गट भिडले, शेवगावमध्ये तुफान राडा, घटनेत अनेक जण गंभीर

याबाबत अधिक माहिती अशी की, तमिळनाडूमध्ये (Tamilnadu) विषारी दारु पिवून मृत्यू झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. एक चेंगलपट्टू जिल्ह्यात आणि दुसरी विल्लुपुरम जिल्ह्यात. उलट्या, डोळ्यात जळजळ आणि चक्कर आल्याच्या तक्रारींनंतर मारक्कनमजवळील विल्लुपुरम जिल्ह्यातील एक्कीयरकुप्पम गावात सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील चौघांचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

चेंगलपट्टू जिल्ह्यातील चिथमूर येथे एक प्रकरण समोर आले आहे जिथे एकाच कुटुंबातील दोन लोकांचा मृत्यू झाला. तर अन्य एका व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरुवातीला कौटुंबिक वादातून हा आत्महत्येचा प्रयत्न असावा असे आम्हाला वाटले, परंतु त्याची लक्षणे पाहिल्यानंतर आम्हाला ही विषारी दारूची घटना असल्याचा संशय आला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

TamilNadu News
Sambhaji Maharaj Jayanti celebrations: इंग्लंडमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

दरम्यान चेंगलपट्टूमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात अलर्ट जारी करण्यात आला होता. नंतर, अशीच लक्षणे असलेल्या आणखी दोन लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यामध्ये एकूण चार जणांचा मृत्यू झाला, तर पाचव्यावर उपचार सुरू आहेत. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी दोन्ही जिल्ह्यातील 3 निरीक्षक आणि 4 उपनिरीक्षकांना निलंबित केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com