टाटा ग्रुपचा मीठापासून ते एअर इंडिया पर्यंतचा प्रवास पहा तीन मिनिटांत (Video)

टाटा ग्रुप ही कंपनी स्टील, चहा, ऑटो आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करणारी मोठी कंपनी आहे.
Tata Group
Tata GroupSaam Tv

टाटा (Tata) ग्रुप हा देशातील सर्वात मोठा ग्रुप आहे. देशात उद्योगधंदे वाढवण्यात टाटा ग्रुपचा मोठा सहभाग आहे. भारतात अनेक असे प्रोजेक्ट आहेत जे पहिल्यांदा टाटा ग्रुपनेच केले आहेत. यामध्ये स्टील प्लांटपासून एअरलाइन्स सुरू करण्यापर्यंतच्या कामांचा समावेश आहे. टाटा ग्रुपने देशात पहिल्यांदा केलेल्या अशा आणखी अनेक कामांची यादी आहे आणि ती आता 3 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये (Video) शेअर केली आहे. टाटा ग्रुपने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

तीन मिनीटांच्या या व्हिडिओमध्ये टाटा ग्रुपचा (Tata Group) संपूर्ण इतिहास सांगितला आहे. टाटा ग्रुपने देशात अनेक अशी कामे केली आहेत. जी देशात पहिल्यांदा झाली आहेत. टाटा ग्रुपचे संस्थापक जमशेदजी टाटा (Jamsetji Tata) यांनीच नवनवे उद्योग सुरु करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना भारतीय उद्योगाचे भीष्म पितामह म्हटले जाते.

Tata Group
Mumbai : मुंबईकरांसाठी टाटा आणि महावितरणकडून वीजदरात 4 टक्क्यांची घट | SAAM TV

या व्हिडिओमध्ये टाटा ग्रुपची (Tata Group) सुरुवात ते आतापर्यंतचा इतिहास दाखवला आहे. 1877 मध्ये टाटा ग्रुपच्या एम्प्रेस मिलमध्ये पहिल्यांदाच ह्युमिडिफायर आणि फायर स्प्रिंकलरसारखी उपकरणे बसवण्यात आली होती. एवढेच नाही तर, ग्रुपने 1907 मध्ये देशातील पहिला एकात्मिक टाटा स्टील प्लॉट, 1912 मध्ये देशातील पहिली सिमेंट इंडिया सिमेंट कंपनी सुरु केली. देशातील आपल्या प्रकारची पहिली औद्योगिक बँक सुरु केली. ती म्हणजे 1917 मध्ये टाटा इंडस्ट्रियल बँक सुरु केली. पहिली पूर्ण- भारतीय विमा कंपनी न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी 1919 आणि पहिली एअरलाइन टाटा एअरलाइन्स (Tata Airlines) आता याचे नाव एअर इंडिया असे आहे ही 1932 मध्ये सुरू झाली.

टाटा ग्रुपची (Tata) प्रतिमा ही कामामुळे तयार झाली आहे. टाटा ग्रुपवरील लोकांचा विश्वास वाढला आहे. 1886 मध्ये सुरु केलेली एम्प्रेस मिल ही कामगारांच्या कल्याणासाठी काम करणारी देशातील पहिली कंपनी ठरली. तर शैक्षणिक क्षेत्रात कंपनीने 1909 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, 1936 मध्ये समाजासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) सुरु केले आहे. आणि कर्करोगाच्या उपचारांसाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटल सुरु केले. हे रुग्णालय ऐतिहासि आहे याचा अनेकांना फायदा झाला आहे.

टाटा ग्रुपने (Tata Group) देशात पहिल्यांदा आयोडीनययुक्त मीठ पॅकेटमध्ये बाजारात आणले. 1983 मध्ये टाटा सॉल्टची निर्मिती करण्यात आली आणि ते आपल्या प्रकारच्या नावीन्यपूर्णतेचे उदाहरण बनले. कंपनीने 1998 मध्ये देशातील पहिली स्वदेशी SUV Tata Safari, 2013 मध्ये पहिली हायड्रोजन बस Starbus, 2018 मध्ये 5-स्टार रेटिंग कार Tata Nexon आणि 2021 मध्ये पहिले सर्वात स्लिम मेकॅनिकल घड्याळ तयार केले आहे. टाटा ग्रुपचा हा आतापर्यंत सर्व प्रवास या व्हिडिओत (Video) तीन मिनिटांत दाखवण्यात आला आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com