भारताशी वाद पडला महागात! पाकिस्तानात चहाची किंमत ऐकून थक्क व्हाल

पाकिस्तानात महागाईने पुन्हा एकदा कळस गाठला आहे. गेल्या एका वर्षात पाकिस्तानमध्ये खूप महागाई झाली आहे.
भारताशी वाद पडला महागात! पाकिस्तानात चहाची किंमत ऐकून थक्क व्हाल
भारताशी वाद पडला महागात! पाकिस्तानात चहाची किंमत ऐकून थक्क व्हाल Saam TV

पाकिस्तानात महागाईने पुन्हा एकदा कळस गाठला आहे. गेल्या एका वर्षात पाकिस्तानमध्ये खूप महागाई झाली आहे. पाकिस्तानातील शहरांमध्येच नाही तर खेड्यांमध्येही रोजच्या गोष्टींच्या भावांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. चहाची चव पाकिस्तानच्या लोकांसाठी महाग झाली आहे. जर पाकिस्तानला हवे असते तर त्यांना भारतातून स्वस्त दरात साखर मिळाली असती पण यावर्षी भारतातून ती आयात करण्यास नकार दिला होता.

पाकिस्तानचा सुपरस्टार गोलंदाज शोएब अख्तरचे शहर रावळपिंडीमध्ये चहाची चव महाग झाली आहे. येथे एका कप चहाची किंमत 40 रुपये झाली आहे. पाकिस्ताच्या स्थानीक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एक चहावाला म्हणाला की, पूर्वी एका कप चहाची किंमत 30 रुपये होती, जी आता 40 रुपये झाली आहे. अलीकडेच पुन्हा एकदा चहाचे दर वाढवण्यात आले आहेत. चहाची पाने, चहाच्या पिशव्या, दूध, साखर आणि गॅसच्या किंमती वाढल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये चहाच्या किंमतीत 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

भारताशी वाद पडला महागात! पाकिस्तानात चहाची किंमत ऐकून थक्क व्हाल
NCB ची कारवाई फर्जीच; माझा जावई निर्दोष- नवाब मलिक

या व्यक्तीने सांगितले की दुधाची किंमत 105 रुपयांवरून 120 रुपये प्रति लीटर झाली आहे. याशिवाय चहाच्या पानांची किंमत 800 ते 900 रुपये आणि गॅस सिलेंडरची किंमत 1500 ते 3000 हजारांपर्यंत गेली आहे. हा चहावाला म्हणाला की त्याच्या कमाईवर वाईट परिणाम झाला आहे आणि त्याला चहाची किंमत वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. अब्दुल अझीझ नावाच्या आणखी एका चहावाल्याने सांगितले की माझी एका दिवसाची एकूण कमाई 2600 रुपये होती. पण जेव्हा मी माझा पूर्ण नफा जोडला तेव्हा मी फक्त 15 रुपयांनी नफ्यात होतो. मी यातून अजिबात उदरनिर्वाह करू शकलो नाही. म्हणूनच मी चहाची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की चहाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे लहान चहाच्या दुकानाच्या व्यवसायावर सर्वात जास्त नकारात्मक परिणाम झाला आहे. कारण अनेक नियमित ग्राहकांनी चार किंवा तीन कपऐवजी तीन किंवा दोन कप पिण्यास सुरुवात केली आहे. त्याच वेळी, काही लोक आहेत जे महागाईमुळे चहा पूर्णपणे सोडून देण्याचा विचार करत आहेत.

पाकिस्तान सरकारच्या आग्रहामुळे या देशातील लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. काही काळापूर्वी, ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तानने आयात केलेल्या 28,760 मेट्रिक टन साखरेचा माल पाकिस्तानात पोहोचला आहे. या साखरेसाठी पाकिस्तानने प्रति किलो सुमारे 110 रुपये दिले आहेत. त्याच वेळी, गेल्या वर्षी जेव्हा टीसीपीने एक लाख टन साखर आयात केली होती, तेव्हा किंमत 90 रुपये प्रति किलो होती. भारतीय अधिकाऱ्यांच्या मते, जर पाकिस्तानला हवे असते तर त्यांना भारताकडून खूप कमी किंमतीत साखर मिळू शकली असती.

भारताशी वाद पडला महागात! पाकिस्तानात चहाची किंमत ऐकून थक्क व्हाल
मशरूम पावडर कुपोषित बालकांसाठी फायदेशीर

यावर्षी एप्रिलमध्ये पाकिस्तानने भारतातून साखर आयात करण्यास नकार दिला होता. पाकिस्तानने म्हटले की, जोपर्यंत भारत काश्मीरमध्ये कलम 370 पुनर्स्थापित करत नाही, तोपर्यंत पाकिस्तान भारताला साखर आणि गहू यासारख्या अत्यावश्यक वस्तूंची आयात करण्याची परवानगी देऊ शकत नाही. 2018 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापार 2 अब्ज डॉलर्सवरून 37 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढू शकतो जर भारत-पाकिस्तान अवघड व्हिसा धोरण, उच्च दर आणि क्लिष्ट कार्यपद्धती दूर करू शकले तर ते शक्य आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.