शिक्षिकेचं काळिमा फासणारं कृत्य, 15 वर्षीय मुलाशी ठेवले लैंगिक संबंध; आणि...

शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते अत्यंत पवित्र आहे, परंतु या पवित्र नात्याला काळीमा फासण्याचं काम एका शिक्षिकेने केले आहे.
शिक्षिकेचं काळिमा फासणारं कृत्य, 15 वर्षीय मुलाशी ठेवले लैंगिक संबंध; आणि...
शिक्षिकेचं काळिमा फासणारं कृत्य, 15 वर्षीय मुलाशी ठेवले लैंगिक संबंध; आणि...Saam Tv

फ्लोरिडा: शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते अत्यंत पवित्र आहे, परंतु या पवित्र नात्याला काळीमा फासण्याचं काम एका शिक्षिकेने केले आहे. या प्रकरणाबाबत बोलताना डोरालचे प्रवक्ते रे वाल्देस म्हणाले की, जॉन आई. स्मिथ के -8 केंद्रातील एका शिक्षीकेवर 15 वर्षाच्या विद्यार्थासोबत लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. 15 वर्षांच्या मुलाने डोरालच्या डिटेक्टिव्हला सांगितले की ती शिक्षीका गर्भवती आहे. शनिवारी सकाळी बॉण्ड सबमिट केल्यानंतर मुलाला गिटनर लुफोर्ड नाईट करेक्शनल सेंटरमधूनही सोडण्यात आले आहे. वाल्देस म्हणाले की संबंधीत शिक्षीकेने चौकशी दरम्यान सर्व गोष्टी कबूल केल्या आहेत.

शिक्षिकेचं काळिमा फासणारं कृत्य, 15 वर्षीय मुलाशी ठेवले लैंगिक संबंध; आणि...
पुण्यात खळबळ! एकतर्फी प्रेमातून 14 वर्षीय तरुणीचा खून

डोरल पोलीस आणि मियामी-डेड स्कूल बोर्ड पोलीस मार्चपासून 41 वर्षीय हॅरी काल्वी यांच्यावरील आरोपांची चौकशी करत आहेत. याच महिन्यात मियामी-डेड काउंटीमध्ये अटक करण्यात आलेल्या काल्वी या तिसरी शिक्षीका आहे. अधिकाऱ्यांना पहिल्यांदा मार्चमध्ये विद्यार्थी आणि शिक्षीका यांच्यातील संबंधांबाबत सांगितले गेले. पोलिसांचे म्हणणे आहे की, जेसी बर्म्युडेझ सीनियर हायस्कूलमधील एका विद्यार्थ्याने इतरांना स्वतःचा आणि काल्वीने त्याच्यासोबत शारिरीक संबंध ठेवल्याचा व्हिडिओ दाखवल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. त्यानंतर सर्व माहिती समोर आली आहे.

या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायाधीश म्हणाले, 'लहान मुलाला संमती देण्याचा कायदेशीर अधिकार नाही, जरी मुलाने होकार दर्शवला तरीही, " वाल्देस म्हणाले. "अशा घटणांची जबाबदारी प्रौढ व्यक्तीवर आहे." नोंदवलेल्या तक्रारीत विद्यार्थ्याच्या फोनमध्ये काल्वी आणि विद्यार्थ्याचे नग्न फोटो आढळले आहेत. एका व्हॉट्सअॅप मेसेज थ्रेडनुसार दोघांनी एकमेकांना "आय लव्ह यू" आणि इतर रोमँटिक भावना, विद्यार्थी वापरत असलेले क्रेडिट कार्ड आणि ऑडिओ रेकॉर्डिंगसह मजकूर पाठवला यावरुन काल्वी आणि मुलामध्ये नाते असल्याचे सिद्ध होते.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.