शिक्षक भरती घोटाळा, बड्या मंत्र्याच्या घरात सापडला पैशांचा ढीग; ईडीने घेतलं ताब्यात

छापेमारीत मोठं घबाड हाती लागलं असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला.
parth chatterjee arrested
parth chatterjee arrestedSaam TV

कोलकत्ता : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पश्चिम बंगालचे माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ईडीने अटक केल्यानंतर चटर्जी यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. (West Bengal Minister Parth Chatterjee Arrested By ED)

parth chatterjee arrested
मोठी बातमी! आदित्य ठाकरेंचा वाहून गेलेला पूल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभारणार

पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने टीएमसी पक्षाचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्यासह त्यांच्या डझनभर निकटवर्तीयांच्या घरांवर छापे टाकले. शुक्रवारी रात्री ईडीने ही छापेमारी केली. या छापेमारीत मोठं घबाड हाती लागलं असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला. घरांवर छापे टाकून मोठी रोकड जप्त केली.

छापेमारीत अनेक गुन्हे दाखले आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेले हे पैसे एसएससी घोटाळ्याशी निगडीत असल्याचा संशय ईडीला आहे. कारवाईच्या काही मिनिटांनंतर भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी "ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है.. असे म्हणत पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे.

parth chatterjee arrested
'नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती'

ईडीने एकाच वेळी पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोगाचे (एसएससी) माजी सल्लागार शांती प्रसाद सिन्हा, पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष कल्याणमय गांगुली आणि इतर नऊ जणांच्या घरांवर छापे टाकले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोगाच्या शिफारशींनुसार सरकारी प्रायोजित आणि अनुदानित शाळांमधील गट 'क' आणि 'डी' कर्मचारी आणि शिक्षकांच्या भरतीमधील कथित अनियमिततेची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) चौकशी करत आहे.

सध्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री पदावर असलेले पार्थ चॅटर्जी कथित घोटाळा झाला तेव्हा शिक्षण मंत्री होते. यापूर्वी सीबीआयने त्यांची दोनदा चौकशी केली आहे. पहिली चौकशी 25 एप्रिल, तर दुसरी 18 मे रोजी झाली. 2016 मध्ये ही भरती प्रक्रिया सुरू झाली. ज्यामध्ये बनावट पद्धतीने प्रवेश मिळवण्यासाठी ओएमआर शीटमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता.

इतकंच नाही तर, यामध्ये नापास उमेदवार लाखो रुपयांची लाच देऊन उत्तीर्ण झाले असल्याचा आरोप झाला. या प्रकरणात थेट शिक्षणमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. यामध्ये अनेक लोक सामील असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यांना लवकरच अटक केली जाईल.

Edited By Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com