Telangana News: दुःखद! जन्मदिनीच विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, मृतदेहाजवळ आई-वडिलांनी कापला केक
Hyderabad News: हैदराबादमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथे एका शालेय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विद्यार्थ्याचे वय अवघे १६ वर्षे होते. 19 मे रोजी त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला.
वेदनादायक बाब म्हणजे त्याच दिवशी या विद्यार्थ्याचा वाढदिवस असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र हे आनंदाचे काही वातावरण काही क्षणातच शोक सभेत बदललं. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडिलांनी मृतदेहाजवळ केक कापून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत मुलाचे नाव सचिन आहे. 10वीत शिकणारा सचिन 18 मे रोजी वाढदिवस साजरा करण्यासाठी आसिफाबाद शहरात खरेदीसाठी गेला होता. बाजारात त्याला छातीत दुखू लागलं आणि तो खाली पडला. त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना मंचेरियल शासकीय रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)
सचिनचा मृतदेह गावातील त्याच्या घरी आणण्यात आला. कुटुंब दु:खी होते मात्र मुलाच्या मृतदेहाजवळ वाढदिवसाचा केक कापण्यात आला. केक कापताना मयत मुलाचे वडील गुणवंतराव आणि आई ललिता यांचे दु:ख पाहून तेथे उपस्थित सर्वजण रडू लागले होते.
केक कापताना मुलांनी सचिनसाठी वाढदिवसाचे गाणे गायले तर स्थानिक ग्रामस्थांनी त्याच्या स्मरणार्थ मेणबत्त्या पेटवल्या. मित्रांनी सचिनच्या फोटोसोबत वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा एक मोठा फ्लेक्सी बॅनरही लावला.
सचिन आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्सुक होता. त्याच्या पालकांना यावेळी त्यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा करायचा होता. जो वाढदिवस म्हणून साजरा करायचा होता तोच कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवारासाठी शोकदिन झाला हे दुर्दैवी आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.