श्रीमंताशी लग्न करण्याचा मोह भोवला; पठ्याने लग्नाच्या नावाखाली 130 महिलांना विकले

तालिबानने Taliban उत्तर अफगाणिस्तानात North Afghanistan एक व्यक्तीला अटक केली आहे. त्या व्यक्तीवर आरोप आहे की, त्याने अनेक महिलांची विक्री केली आहे.
श्रीमंताशी लग्न करण्याचा मोह भोवला; पठ्याने लग्नाच्या नावाखाली 130 महिलांना विकले
श्रीमंताशी लग्न करण्याचा मोह भोवला; पठ्याने लग्नाच्या नावाखाली 130 महिलांना विकलेSaam Tv

तालिबानने Taliban उत्तर अफगाणिस्तानात North Afghanistan एक व्यक्तीला अटक केली आहे. त्या व्यक्तीवर आरोप आहे की, त्याने अनेक महिलांची विक्री केली आहे. या व्यक्तीवर आरोप आहे की त्याने लग्नाच्या बहाण्याने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात अडकवले आणि नंतर महिलांची विक्री केली. तालिबानचे प्रांतीय पोलीस प्रमुख दामुल्ला सेराज यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, सोमवारी रात्री उशिरा या व्यक्तीला उत्तर जझान प्रांतातून अटक करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

पोलिसांनी या प्रकरणी सांगितले की, आम्ही अद्याप आमच्या तपासाच्या प्राथमिक टप्प्यात आहोत. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. या प्रकरणाबाबत अनेक प्रकारची माहिती मिळण्याची आशा आहे. जझान प्रांतातील जिल्हा पोलीस प्रमुख मोहम्मद सरदार मुबारीझ यांनी एएफपीला सांगितले की, हा माणूस ज्या महिलांना त्यांची आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा करायची आणि स्थायिक होण्यासाठी लग्न करायचे आहे त्यांना लक्ष्य करत असे. हा माणूस या महिलांना एका श्रीमंत व्यक्तीशी लग्न करून देईल, असे आश्वासन देत असे. यानंतर तो त्यांना दुसऱ्या प्रांतात नेऊन विकत असे. या व्यक्तीवर जवळपास 130 महिलांची अशा प्रकारे तस्करी केल्याचा आरोप आहे.

श्रीमंताशी लग्न करण्याचा मोह भोवला; पठ्याने लग्नाच्या नावाखाली 130 महिलांना विकले
Ahmednagar: गाडी लावण्याच्या वादातून डॉक्टर भावांमध्ये गोळीबार; 1 जखमी

अनेक लोक अफगाणिस्तानातून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत;

अफगाणिस्तानमध्ये गुन्हेगारी, घराणेशाही आणि भ्रष्टाचार नवीन नाही, परंतु वाढत्या गरिबीमुळे अफगाणिस्तानातील परिस्थिती बिकट झाली आहे. अफगाणिस्तानातील परिस्थिती पाहता अनेक लोक येथून पळून जाण्याच्या प्रयत्नात आहेत.

अलीकडेच, तालिबानच्या अंतर्गत मंत्रालयाने सांगितले होते की, पासपोर्ट विभागाच्या सदस्यांसह 60 जणांना पासपोर्ट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मंत्रालयाने असेही म्हटले आहे की ते काबूलमधील पासपोर्ट कार्यालय तात्पुरते बंद करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com