
वृत्तसंस्था: मध्य प्रदेशात इंदूर येथून राजस्थानकडे जात असलेल्या बसचा रतलाम जिल्ह्यात भीषण अपघात (terrible accident) झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातातील जखमींवर जिल्हा रुग्णालयामध्ये (hospital) उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक ट्रॅव्हल्स मंदसौरची टुरिस्ट बस पहाटे ४ वाजेच्या सुमारास रतलाम जिल्ह्यातील (district) जावरा तालुक्यातील धोधरजवळील रिछा गावातील चांदा ढाब्यासमोर पलटली आहे.
हे देखील पाहा-
या अपघातात एका मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर बसमधील ४१ प्रवाशांची (passengers) प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना जावना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या ६ जणांना रतलाम जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान, अपघाताच्या (accident) वेळेस बस ओव्हरलोड होती, अशी माहिती मिळाली आहे. बसमध्ये सामान जास्त होते, असं सांगण्यात येत आहे. रविवारी रात्री बस इंदूरहून जोधपूरकडे रवाना झाली.
यादरम्यान धोधरजवळील रूपनगर येथे बस अनियंत्रित झाल्याने पलटली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्जैनहून जोधपूरला जाण्यासाठी २० मजूर बसमध्ये चढले होते. या अपघाताची माहिती मिळताच जावरा एसडीएम हिमांशू प्रजापती, जावरा नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी व्ही. डी. जोशी, धोधर पोलीस स्टेशनचे एसआय जगदीश कुमावत घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. उपस्थित लोकांनी जखमींना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बसमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार की, बस चालकाने जावरा जवळील ढाब्यावर जेवण केले. तिथून बस जोधपूरकडे निघाली होती. यानंतर बस धोधरजवळील रुपनगर फांते येथील ढाब्याजवळ उभ्या असलेल्या वाहनांना धडक देत बस मोठ्या झाडावर जोरात आदळल्याने बस पलटी झाली. या अपघाताच्या वेळी बसचा वेग साधारण १०० ते १२० किमी इतका होता. बस उलटली तेव्हा बहुतांश प्रवासी झोपलेले होते. यामुळे अपघातानंतर प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. बस सरळ करण्यासाठी घटनास्थळी क्रेन मागवण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Edited By- Digambar Jadhav
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.