लस घ्या अन् सेक्स वर्कर सोबत घालवा फुकट वेळ; 'या' सरकारचा अजब निर्णय
लस घ्या अन् सेक्स वर्कर सोबत घालवा फुकट वेळ; 'या' सरकारचा अजब निर्णयSaam TV

लस घ्या अन् सेक्स वर्कर सोबत घालवा फुकट वेळ; 'या' सरकारचा अजब निर्णय

2 वर्षाच्या अधिक काळापासून सुरू असलेल्या कोरोना महामारीने संपूर्ण जग त्रस्त आहे. आजही काही ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत.

ऑस्ट्रिया: 2 वर्षाच्या अधिक काळापासून सुरू असलेल्या कोरोना महामारीने संपूर्ण जग त्रस्त आहे. आजही काही ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. काही महिन्यांपूर्वी जगातील अनेक देशांनी कोरोना लसीवर काम केले आहे आणि सध्या कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लस हे एकमेव शस्त्र आहे ज्यामुळे आपण कोरोनाशी लढू शकता.

अशा परिस्थितीत सर्व लोकांनी कोरोनाची लस घ्यावी यासाठी अनेक नवीन आणि वेगवेगळे मार्ग अवलंबून पाहिले आहेत. जेणेकरुन ते आपलं लसीकरण पुर्ण करु शकतात आणि आपण कोरोनाला हरवू शकतो. पण ऑस्ट्रीयामध्ये एक अशी जागा आहे जिथे लोकांना कोरोनाची लस घेतल्यानंतर खूप वेगळी ऑफर दिली जात आहे. हे जाणून तुम्हीही थक्क व्हाल. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात..

लस घ्या अन् सेक्स वर्कर सोबत घालवा फुकट वेळ; 'या' सरकारचा अजब निर्णय
IND vs NZ: 'हे' खेळाडू करु शकतात आज भारतीय संघात पदार्पण

लस घ्या आणि सेक्स वर्करसोबत घालवा वेळ

स्थानीक माध्यमांच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये एक वेगळी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोनाची लस घेणाऱ्या व्यक्तीला एक वेगळी ऑफर दिली जात आहे त्यामध्ये ते लस घेतल्यानंतर व्यक्तीला सेक्स वर्कर सोबत वेळ घालवायला मिळणार आहे. 'फन प्लास्ट' नावाच्या वेश्यालयाने ही अनोखी ऑफर आणली आहे. यासोबतच हे वेश्यालय स्वतःच्या जागेवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देत आहे.

ऑफरचा फायदा घेण्यासाठी लोकांची गर्दी

या विचित्र ऑफरमध्ये लसीकरण करणारी व्यक्ती आपल्या आवडीच्या सेक्स वर्करसोबत 30 मिनिटे मोफत घालवू शकणार आहे. विशेष म्हणजे या ऑफरचा लाभ घेण्यासाठी लोकही पोहोचत आहेत. या संदर्भात ब्रोथलचे म्हणणे आहे की लसीकरणाचा प्रचार करण्यासाठी ही ऑफर दिली जात आहे हे समजून घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.

ऑफर देण्यामागे 'हे' आहे कारण

खरं तर, ऑस्ट्रिया सरकारने ही अनोखी आणि सर्वात वेगळी ऑफर देण्यामागे एक खास आणि अतिशय महत्त्वाचे कारण सांगितले आहे. ऑस्ट्रियातील केवळ 64 टक्के लोकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी कठोर निर्णयही घेण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, रेस्टॉरंट, पब, सलून आणि इतर सार्वजनिक ठिकाणी लस नसलेल्या लोकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. देशात कठोर नियम लागू आहेत. हॉटेल आणि सिनेमागृहात 25 टक्के पेक्षा जास्त लोकांच्या कार्यक्रमात जाण्यासाठी संपूर्ण लसीकरणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

'ही' ऑफर उपयुक्त ठरेल

ही अनोखी ऑफर लोकांना लस घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. ऑस्ट्रियातील वेश्यालयात मोठ्या संख्येने लोक येत असल्याने, सेक्स वर्करसोबत मोकळा वेळ घालवण्याची ऑफर कामी येऊ शकते. 'फन प्लास्ट'चा हा उपक्रम लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकणार आहे, असा विश्वासही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट टाळणे सोपे होणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com