रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डमध्ये अग्नितांडव: 58 जणांचा होरपळून मृत्यू

इराकमधील एका रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डला भीषण आग लागली आहे. माहिती आहे की या आगीत तब्बल 58 जणांचा मृत्यू झाला आहे. तरी मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डमध्ये अग्नितांडव: 58 जणांचा होरपळून मृत्यू
रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डमध्ये अग्नितांडव: 58 जणांचा होरपळून मृत्यूSaam Tv

बगदाद: इराकमधील Iraq एका रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डला भीषण आग लागली आहे. माहिती आहे की या आगीत तब्बल 58 जणांचा मृत्यू झाला आहे. तरी मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. The Corona ward of a hospital in Iraq has caught fire.

इराकमधील दक्षिणेतील एक शहर म्हणजेच नसीरियमधील एका रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डला भीषण आग लागली आहे. या आगीत 58 जणांचा मृत्यू Death झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, या आगीमुळे 67 हून अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून मदत आणि बचाव Rescue कार्य सुरू करण्यात आले आहे. परंतु या घटनेमुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या भीषण आगीतून आत्तापर्यंत 16 जणांची सुटका करण्यात आली. स्थानिक आरोग्य अधिकारी यांनी माहिती दिली की करोना वॉर्डमध्ये ही आग लागली आहे. 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने वृत्त दिले की, ऑक्सिजन सिलेंडरचा Oxygen Cylinder स्फोट झाल्याने ही आग लागली आहे. या आगीत होरपळून मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्यास अडचण येत आहेत. काल रात्री सोमवारी ही आग लागली असल्याचे सांगण्यात येते.

रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डमध्ये अग्नितांडव: 58 जणांचा होरपळून मृत्यू
दुर्दैवी ! जनरेटरच्या धुरात गुदमरून कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

एका आरोग्य कर्मचाऱ्याने माहिती दिली की, आगीचा भडका जोरात उडाला होता. यामध्ये काही करोनाबाधित होरपळून मृत पावले. अग्निशमन दलाच्या जवानांना आणि मदत व बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांना आगीच्या ठिकाणी दाखल होण्यास प्रयन्त करावे लागले.

तेथील पंतप्रधान मुस्तफा अल कादिमी यांनी या घटनेनंतर आपात्कालीन बैठक बोलावली होती. रुग्णालयातून अनेक मृतदेह काढण्याचे काम सुरु आहे. तसेच जखमी झालेल्यांवर उपचार सुरु आहेत.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com