Earthquake|देशात 5 ठिकाणी भूकंपाचे धक्के

देशात गेल्या काही तासात 5 वेगवेगळ्या भागात ठिकाणी भूकंपाचे हादरे बसले आहेत. देशातील बिकानेर आणि मेघालय भुकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरला आहे.
Earthquake|देशात 5 ठिकाणी भूकंपाचे धक्के
Earthquake|देशात 5 ठिकाणी भूकंपाचे धक्केSaam Tv

नवी दिल्ली : देशात गेल्या काही तासात 5 वेगवेगळ्या भागात ठिकाणी भुकंपाचे हादरे बसले आहेत़. देशातील बिकानेर आणि मेघालय भुकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरला आहे. मात्र, या भुकंपामुळे आतापर्यंत कोणत्याही जीवित अथवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही.

राजस्थानच्या Rajasthan बिकानेरमध्ये पहाटे 5 वाजून 24 मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.3 एवढी मोजली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने National Centre for Seismology Meghalaya  माहिती दिली की, या भुकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानात असून 29.99 आणि 70.05 अक्षांश आणि रेखांक्षवर 110 किमी खोल आहे. तसेच या भुकंपाचे जे केंद्रबिंदू आहे ते बिकानेरपासून तब्बल 343 किमी आणि जोधपूरपासून 439 किमी दूर आहे. या भूकंपाचा अधिक धक्का पाकिस्तानातील पंजाब प्रांतासह भारतात राजस्थानात देखील जाणवला आहे.

Earthquake|देशात 5 ठिकाणी भूकंपाचे धक्के
विदर्भ ग्रामीण पतसंस्थेत 1 कोटी 11 लाखांचा घोटाळा; 2 आरोपी गजाआड

या भूकंपाच्या अगोदर मेघालयातील वेस्ट गारो हिल्स भागात पहाटे 2.10 मिनिटांनी झटका जाणवला गेला होता. त्यांची तीव्रता 4.1 रिश्टर स्केलवर एवढी मोजली गेली. या भूकंपाचे केंद्रबिंदू शिलॉगपासून 159 किमी आणि बांगला देशातील ढाकापासून 230 किमी दूर आहे.

त्याच वेळी लेह पहाटे 4.57 वाजता लडाख येथे भूकंपाचा झटका जाणवला. त्यांची तीव्रता रिश्टरस्केलवर 3.6 इतकी होती. त्याची खोली 200 किमी खोल होती. लेह शहरापासून 19

किमीवर त्याचा केंद्रबिंदू होता. हरियाना येथील सोनपत येथे पहाटे 1.08  त्यांची तीव्रता 2.3 आणि पहाटे 2.06 वाजता त्यांची तीव्रता 2.1असे लागोपाठ दोन भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com