मुलांच्या लसीकरणाला सुरुवात: 2 ते 6 वर्षांच्या 5 मुलांना कोव्हॅक्सीनचा पहिला डोस

सर्व मुले ठीक आहेत. त्यांच्यात कोणतेही दुष्परिणाम दिसुन आलेले नाहीत.
मुलांच्या लसीकरणाला सुरुवात:   2  ते 6  वर्षांच्या 5 मुलांना कोव्हॅक्सीनचा पहिला डोस
मुलांच्या लसीकरणाला सुरुवात: 2 ते 6 वर्षांच्या 5 मुलांना कोव्हॅक्सीनचा पहिला डोसgoogle

लखनऊ : देशातील कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 2 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. आज कानपूरच्या देहात जिल्ह्यात एका खासगी डॉक्टरने आपल्या दोन वर्ष 8 महिन्याच्या मुलीला कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस दिला. मुलांना या लसी देण्यापुर्वी मुलांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. कोव्हॅक्सीनच्या योजनेनुसार ही लस देण्यात आली.

आता मुलांवर कोरोना लसीची चाचणी देशात सुरू झाली आहे. आतापर्यंत 2 ते 6 वयोगटातील 5 मुलांना लसी देण्यात आल्या. पहिल्यांदाच दोन वर्षांच्या आठ महिन्यांच्या मुलीला लसीकरण करण्यात आले. कानपूर ग्रामीण भागात एका खासगी डॉक्टरांनी स्वतःच्या मुलीचे लसीकरण केले. या मुलांना लसी देण्यापूर्वी रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. कोवाक्सिनच्या योजनेनुसार ही लस देण्यात आली आहे.

कानपूरचे डॉक्टर जे एस कुशवाह म्हणाले, आतापर्यंत 12-18 वर्ष वयोगटातील 20 मुलांना लस दिली गेली आहे, 6 ते 12 वर्षांच्या 20 मुलांनाही डोस देण्यात आला आहे, तर 2 ते 6 वर्षांच्या पाच मुलांना लस देण्यात आली आहे. सर्व मुले ठीक आहेत. त्यांच्यात कोणतेही दुष्परिणाम दिसुन आलेले नाहीत. मात्र थोड्याशा वेदना होत आहेत.

मुलांच्या लसीकरणाला सुरुवात:   2  ते 6  वर्षांच्या 5 मुलांना कोव्हॅक्सीनचा पहिला डोस
हो झाडंही घेतात टेन्शन

जुलै महिन्यात केंद्र सरकार सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोव्हॅक्सीन लसीच्या लसीकरणाला मंजुरी देऊ शकते, असे संकेत दिले आहेत. ही लस विकसित करणाऱ्या अमेरिकन कंपनी नोव्हावॅक्सने अमेरिकेतील मुलांवर चाचण्या केल्यानंतर याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. अमेरिकेच्या मेक्सिको राज्यातील 119 शहरांमधील फेज-3 चाचणीचे निकाल चांगले आले आहेत. याची टक्केवारी 90.4 टक्के इतकी आहे.

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीला सप्टेंबरपर्यंत मान्यता देण्यात येईल, अशी माहिती दिल्ली एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. कोव्हॅक्सीनच्या फेज II आणि III च्या चाचणीनंतर सप्टेंबरपर्यंत हा डेटा उपलब्ध होईल. या महिन्यात मुलांसाठी कोव्हॅक्सीन मंजूर केले जाऊ शकते. यासह, फायझर-बायोटेकला भारतात मान्यता मिळाल्यास मुलांसाठी ही लस पर्याय ठरू शकते. त्याच बरोबर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना जास्त त्रास होण्याची शक्यताही डॉ. रणदिप गुलेरिया यांनी फेटाळून लावली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com