Marriage News
Marriage NewsSaam Tv

Marriage News: लग्नानंतर पहिल्याच रात्री नव्या नवरीनं केली विचित्र मागणी; ऐकूनच नवरदेवाला घाम फुटला

Up News : मागणी पूर्ण न झाल्याने वधूचा राग अनावर झाला

Up Marriage News: लग्नात भांडणाच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या आणि पाहिल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला लग्नानंतरच्या अशाच एका भांडणाची बातमी सांगणार आहोत. जे ऐकल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. यूपीच्या एका जिल्ह्यातून एक अनोखा प्रकार समोर आला आहे. इथे लग्नानंतर पहिल्याच दिवशी नवरदेवाला नवरीची मागणी पूर्ण न करणे महागात पडले आहे. (Latest Marathi News)

लग्नाच्या पहिल्या रात्री गावातील प्रथेनुसार दिल्या जाणाऱ्या पैशांवरुन हे सगळं प्रकरण घडलं. नववधूच्या इच्छेनुसार पैसे न मिळाल्याने तिनं थेट संसारच मोडण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला हे प्रकरण विचित्र वाटत असेल. मात्र नवरीला मनवता मनवता नवरदेवाला चांगलाच घाम फुटला.

Marriage News
Delhi Capitals: दिल्ली कॅपिटल्सची मोठी घोषणा! ऑस्ट्रेलियाविरुध्दची मालिका गाजवणाऱ्या खेळाडूला सोपवली मोठी जबाबदारी

20 हजार रुपयांची मागणी केली

हे संपूर्ण प्रकरण मुरादाबाद दिलारी पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीतील आहे. या गावातील एका तरुणाने आठवडाभरापूर्वीच जवळच्या गावातील मुलीशी लग्न केले होते. लग्नात दोन्ही पक्षांनी खूप खर्च केला. मात्र लग्नानंतर पहिल्या रात्रीच दोघांमध्ये पैशावरुन वाद झाला.

पत्नीने पतीला मुंह दिखाईमध्ये २० हजार रुपयांची मागणी केली. मात्र पतीने सात हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. जे वधूने घेण्यास नकार दिला. मग काय, लग्नाच्या पहिल्याच रात्रीच दोघांमध्ये वाद सुरू झाला.

Marriage News
Crime News : दोनच दिवसांपूर्वी कामावर ठेवलेल्या मोलकरणीने केलं भयंकर कृत्य; मुंबई येथील धक्कादायक घटना

बायकोला पटवायला घाम फुटला

यानंतर, नववधू तिच्या माहेर गेली. घरी आल्यानंतर मुलीने हा प्रकार तिच्या नातेवाइकांना सांगितला आणि तिला सासरच्या घरी जाण्यास नकार दिला. यानंतर या प्रकरणाची माहिती वधूच्या पतीला देण्यात आली. 

दोन्ही बाजूच्या लोकांनी आणि नवरदेवाने वधूला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती तिच्या म्हणण्यावर ठाम राहिली. प्रकरण वाढत असल्याचे पाहून या प्रकरणी पंचायत बोलावण्यात आली. बरेच जणांनी वधूला समजावून सांगितले. प्रदीर्घ वाटाघाटीनंतर हे प्रकरण मिटले आणि मुलगी पतीसह सासरच्या घरी जाण्यास तयार झाली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com