सावधान ! या शहरात पुन्हा वाढू लागली कोरोनाची संख्या, 31 मे पर्यंत कलम 144 लागू

भारतात कोरोनाची वाढली रुग्णसंख्या
Coronavirus
CoronavirusSaam Tv

वृत्तसंस्था: दिल्ली एनसीआरला लागून असलेल्या यूपीच्या नोएडा (Noida) आणि गाझियाबादमध्ये गेल्या काही रोजच कोरोनाच्या (corona) रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यानंतर आता सरकारने नोएडा म्हणजेच यूपीच्या (UP) गौतम बुद्ध नगरमध्ये ३१ मेपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. सरकारने (government) आधीच नोएडामध्ये मास्क आणि अनेक नियमांचे कडक निर्बंध वाढवले आहे.

गेल्या काही दिवसांपासून यूपीच्या गाझियाबाद आणि नोएडामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने नोएडा, गाझियाबाद आणि लखनौसह राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये (districts) मास्क अनिवार्य केले होते. मात्र, परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नाही. आता झपाट्याने वाढणाऱ्या केसेस पाहता सरकारने पुन्हा एकदा कठोर निर्णय घेतला आहे. नोएडामध्ये ३१ मे पर्यंत सरकारने कलम १४४ लागू केले आहे. नोएडामध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या (patients) पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हे देखील पाहा-

काय म्हणाले पोलीस आयुक्त?

गौतम बुद्ध नगरच्या पोलीस (Police) आयुक्तांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. यावेळी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय धरणे व उपोषण करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पूजा आणि प्रार्थना करण्यास परवानगी नाही. यावेळी, शाळांमध्ये परीक्षेच्या दरम्यान कोविड-19 च्या मार्गदर्शक तत्त्वांची काळजी घेतली जाणार आहे. मुलांमध्ये सामाजिक अंतर लागू केले जाईल.

Coronavirus
देशात इंधन दरवाढीचा भडका! आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर काय?

डीएमने काय केले आवाहन?

नोएडामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दररोज शंभरहून अधिक कोरोनाची प्रकरणे समोर येत आहेत. यादरम्यान अनेक शाळकरी मुलांनाही संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. नोएडामध्ये भूतकाळातील वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, डीएमने एक सल्लागार जारी केला होता आणि लोकांना घाबरू नका असे आवाहन केले होते. ते म्हणाले की, जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील ८४ टक्के बालकांना लसीकरण करण्यात आले आहे. १२ ते १४ वर्षे वयोगटातील ४९ टक्के मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे, तर १८ वर्षावरील प्रत्येकाला लसीकरण करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com